पक्षाने दिलेली आश्‍वासने पूर्ण करू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 मार्च 2017

जगताप, काळजे यांची ग्वाही; उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील विजयाचा जल्लोष

पिंपरी - ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांतदेखील करिष्मा दिसून आला. जनतेने मोदी यांच्या कारभारावर विश्‍वास ठेवून भरभरून मते दिली. पिंपरी-चिंचवडमध्येही भाजपने दिलेली सर्व आश्‍वासने पूर्णत्वाच्या दिशेने नेऊ,’’ अशी ग्वाही भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि नियोजित महापौर नितीन काळजे यांनी शनिवारी दिली.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांपैकी भाजपने उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये अभूतपूर्व यश मिळविले. त्याबद्दल शहर भाजपमार्फत पिंपरी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर जल्लोष करण्यात आला. पेढे वाटून फटाक्‍यांची आतषबाजी करण्यात आली. त्या वेळी जगताप आणि काळजे पत्रकारांशी बोलत होते. खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, नियोजित सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, उमा खापरे, माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, नगरसेवक विलास मडिगेरी, आशा शेंडगे, भीमा बोबडे, महेश कुलकर्णी, नामदेव ढाके, शैलजा मोळक, मोरेश्‍वर शेडगे, संजय मंगोडेकर आदी उपस्थित होते.

जगताप आणि काळजे म्हणाले, ‘‘निवडणुकीत दिलेली आश्‍वासने आम्ही पूर्ण करू. पिंपरी-चिंचवडमध्येही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून भाजपला एकहाती सत्ता मिळाली आहे. त्याचा उपयोग शहराच्या विकासासाठी करू.’’

नियोजित सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशात ‘सबका साथ सबका विकास’ हे धोरण ठेवून काम करत आहेत. त्याच प्रकारचा करिष्मा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवडमध्ये झाला. नरेंद्र मोदी यांचे काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न निश्‍चितच पूर्ण करू.’’ ‘भारतीय जनता पक्षाचा विजय असो’ अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या.

Web Title: The party promises to meet