कॉंग्रेस आणि मनसेतील गळती सुरूच

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जानेवारी 2017

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर कॉंग्रेसमधील गळती सुरूच असून फादर बॉडीनंतर आता युवक पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडला आहे. पालिका निवडणुकीच्या तोंडावर सात नगरसेवकांनी पक्ष सोडून "राष्ट्रवादी'मध्ये प्रवेश केल्यानंतर आता युवक कॉंग्रेसचे शहर उपाध्यक्ष ऍड. सागर चरण यांनीही आपल्या पदाचा राजीनामा काल (ता.13) दिला. ऍड.चरण यांच्यासह शहर व प्रदेश युवकचे पन्नास पदाधिकारी येत्या सोमवारी (ता.16) पुणे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर कॉंग्रेसमधील गळती सुरूच असून फादर बॉडीनंतर आता युवक पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडला आहे. पालिका निवडणुकीच्या तोंडावर सात नगरसेवकांनी पक्ष सोडून "राष्ट्रवादी'मध्ये प्रवेश केल्यानंतर आता युवक कॉंग्रेसचे शहर उपाध्यक्ष ऍड. सागर चरण यांनीही आपल्या पदाचा राजीनामा काल (ता.13) दिला. ऍड.चरण यांच्यासह शहर व प्रदेश युवकचे पन्नास पदाधिकारी येत्या सोमवारी (ता.16) पुणे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे शहर कॉंग्रेस आणखी खिळखिळी झाली असून त्याचा मोठा फटका पालिका निवडणुकीत बसण्याची दाट शक्‍यता पक्षाच्या सूत्रांनीच व्यक्त केली आहे.

इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची कॉंग्रेस आता राहिली नसल्याने नाइलाजाने व अत्यंत खेदाने ती सोडावी लागत असल्याचे ऍड. चरण यांनी आपल्या राजीनामापत्रात नमूद केले आहे. युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्‍वजित कदम यांच्या वाढदिवशीच (ता.13) त्यांना राजीनामा सादर करताना दुसरीकडे ऍड.चरण यांनी त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.सध्याची शहर कार्यकारिणी व त्यातही युवक पदाधिकारी हे वैयक्तिक अजेंडा राबवीत असून त्यांना पक्षाचे कुठलेही देणेघेणे नसल्याने इतर पक्षांच्या कार्यक्रमांना ते बिनदिक्कतपणे हजेरी लावण्यात धन्यता मानीत आहेत. अशा स्थितीत पक्षात राहणे कठीण झाले असल्याने राजीनामा दिल्याचे ऍड.चरण यांनी सांगितले.

'मनसे'चीही गळती
दरम्यान, शहर "मनसे'तही गळती सुरूच आहे. या पक्षाचे पालिकेतील गटनेते अनंत कोऱ्हाळे यांनी आपल्या नगरसेवक आणि गटनेतेपदाचा राजीनामा काल पालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे सोपविला. त्यांच्या पत्नींनी याअगोदरच शिवसेनेत प्रवेश केला आहे. आपणही आता औपचारिकरीत्या शिवसेनेत गेल्याचे त्यांनी सांगितले. मनसेच्या एका नगरसेवकाने याअगोदर भाजपमध्ये प्रवेश केला असून एक नगरसेवक आगामी निवडणूक लढविणार नाहीत. त्यामुळे या पक्षांचे संख्याबळ चारहून फक्त एकवर आले असून आगामी पालिका सभागृहात हा आकडा, तरी कायम राहील की नाही, अशी पक्षाची स्थिती शहरात असल्याचे चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
 

Web Title: party switching jolts congress, mns