विमान रद्द झाल्याने प्रवासी कारने पुण्याला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

वाहतूक कोंडी आणि किमान पाच तास प्रवासाच्या कालावधीमुळे रस्ते प्रवास टाळून नाशिकहून विमानाने पुण्याला निघालेल्या प्रवाशांना शनिवारी प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागला. अलायन्स एअरचे नाशिक-पुणे विमान ऐनवेळी रद्द झाल्याने प्रवाशांना कारनेच पुण्याला पाठविण्यात आले.

पुणे - वाहतूक कोंडी आणि किमान पाच तास प्रवासाच्या कालावधीमुळे रस्ते प्रवास टाळून नाशिकहून विमानाने पुण्याला निघालेल्या प्रवाशांना शनिवारी प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागला. अलायन्स एअरचे नाशिक-पुणे विमान ऐनवेळी रद्द झाल्याने प्रवाशांना कारनेच पुण्याला पाठविण्यात आले.

‘उडेगा देश का आम नागरिक’ (उडान) या योजनेअंतर्गत पुणे-नाशिक विमान सेवा सुरू केली. अनेकदा बंद पडलेली ही सेवा २७ ऑक्‍टोबरपासून पुन्हा सुरू झाली. नाशिकहून दुपारी दोन वाजून ५५ मिनिटांनी हे विमान पुण्यासाठी झेपावते, ते पावणेचार वाजता पुण्यात येते. शनिवारी या विमानाने पुण्याला येण्यासाठी २२ प्रवाशांनी तिकीट आरक्षित केले होते. मात्र, विमान रद्द झाल्याने प्रवाशांना कारमधून पुण्याकडे रवाना केले. दरम्यान, विमानतळाची धावपट्टी दर शनिवारी देखभाल- दुरुस्तीसाठी सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेपाच या वेळेत बंद ठेवण्यात येते, त्यामुळे हे विमान रद्द करावे लागले, असे विमान कंपनीकडून सांगितले. तसेच, तिकिटाची रक्कम परत केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Passenger car to Pune due to plane canceled