बसमध्ये चोरी करणाऱ्याला दिले पोलिसांच्या ताब्यात 

बसमध्ये चोरी करणाऱ्याला दिले पोलिसांच्या ताब्यात 

पुणे - पीएमपीएल बसमधून प्रवास करणाऱ्या तरुणाच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकाविणाऱ्याला प्रवाशांनी पकडून विमानतळ पोलिसांच्या ताब्यात दिले, तर त्याचे तीन साथीदार गर्दीचा फायदा घेऊन पसार झाले. ही घटना शनिवारी सायंकाळी पाच वाजता चंदननगर येथील खराडी बाह्यवळणावर घडली. 

विनोद शिवलाल पवार (वय 52, रा. मुंढवा) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी प्रजोत चौसाळकर (वय 32, रा. कुर्ला, मुंबई ) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चौसाळकर हे मुंबईचे रहिवासी आहेत. ते त्यांच्या कामानिमित्त पत्नीसह खराडीत आले होते. शनिवारी सायंकाळी चौसाळकर व त्यांची पत्नी चंदननगर येथील बाह्यवळण बसथांब्यावरुन बसमध्ये चढले. बसमधील गर्दीचा फायदा घेऊन विनोद पवार याने त्यांच्या गळ्यातील 44 हजार रुपयांची सोनसाखळी चोरून पळण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी चौसाळकर यांनी आरडाओरडा करीत अन्य प्रवाशांच्या मदतीने त्यास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. 

ज्येष्ठ महिलेची सोन्याची बांगडी चोरली 
पीएमपीधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ महिला प्रवाशाच्या हातातील 45 हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी चोरट्याने कापून नेली. ही घटना रविवारी दुपारी दोनला महापालिका ते वारजे माळवाडी या बस प्रवासात घडली. या प्रकरणी ज्येष्ठ महिलेने वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com