गतिरोधकावर एसटी बस आदळली अन् प्रवाश्याचा दातच तुटला 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

पिंपरी : भरधाव एसटी बस गतिरोधकावर आदळल्याने प्रवाशाच्या दात तुटल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बसचालकावर भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

भरत सोनू चिखले (वय 55, रा. साकोरे, ता. आंबेगाव) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार नितीन भास्कर पाटील (वय 45) या चालकावर गुन्हा दाखल झाला. 

रविवारी (ता. 10) रात्री भोसरीतील गव्हाणे वस्ती येथील अशोक हॉटेलसमोरील गतिरोधकावर बस आदळली. यामुळे फिर्यादी यांच्या आसनासमोरील आसन तुटून त्यांच्या तोंडाला लागले. यामध्ये त्यांच्या तोंडाला गंभीर दुखापत झाली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: passenger teeth broken due to ST bus hit on Speed Breaker