पुणे : रिक्षाचालक व सहप्रवाशांनी जबर मारहाण करत प्रवाशाला लुटले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 एप्रिल 2019

पुणे : रिक्षातून जाणाऱ्या प्रवाशाला रिक्षाचालक व सहप्रवाशांनी जबर मारहाण करत रोख रक्कम व मोबाईल असा ऐवज पळवुन नेला. ही घटना उंड्री-पिसोळी रस्त्यावरील टायनी कंपनी येथे बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एकास अटक केली. 

भरत दिनकर साळवे (वय 28, रा. कोंढवा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सुतार पाबुभाई (वय 20, रा.पिसोली) यांनी फिर्याद दिली. पाबुभाई हे उंड्री येथून बुधवारी रात्री साडे आठ वाजता एका रिक्षातून जात होते. रिक्षा टायनी कंपनीसमोर आल्यानंतर रिक्षाचालक साळवे याने रिक्षा थांबविली. त्यानंतर रिक्शाचालक व सहप्रवाशाने फिर्यादी यांना मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांच्याकडील 35 हजार रुपये आणि मोबाईल असा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला.

Web Title: The passenger was robbed by rickshaw drivers and co-passenger