पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीमुळे प्रवासी त्रस्त

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

मंचर - पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर रविवारी (ता. १९) मंचर शहरात सकाळी ११ ते दुपारी चार वाजेपर्यंत नागरिकांना वाहन कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागले. अत्यंत मंद गतीने वाहतूक सुरू होती. 

महात्मा गांधी विद्यालय ते नंदकुमार पेट्रोल पंप हे एक किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी वाहनांना तब्बल पाऊण तास लागत होता. महिला, वृद्ध व लहान मुलांचे हाल झाले. रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यांत साचलेले पाणी व अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. 

मंचरचा आठवडे बाजार रविवारी भरतो. त्यातच श्रावण महिन्यानिमित्त भीमाशंकरला ये-जा करणाऱ्या लक्‍झरी गाड्यांची संख्याही मोठी होती. गेटवेल हॉस्पिटलसमोर अवजड वाहने व कंटेनर समोरासमोर आल्याने वाहतूक कोंडीला सुरवात झाली. दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहन कोंडीचा फटका स्थानिक नागरिकांनाही बसला. बस स्थानक, पिंपळगाव फाटा, मुळेवाडी चौकात वाहतूक कोंडीचे प्रमाण अधिक होते. अनेक वाहनचालकांनी उजव्या कालव्याच्या मार्गाने घोडेगाव व भीमाशंकरला जाणे पसंत केले. ५० हून अधिक एसटी व खासगी बसमधील प्रवाशांना प्रवास कंटाळवाणा झाला. अवजड वाहनांना दिवसाऐवजी रात्री परवानगी दिल्यास वाहन कोंडीचा प्रश्‍न सुटण्यास मदत होईल, असे प्रवाशांनी सांगितले.

Web Title: Passengers suffering due to traffic jam on Pune-Nashik Highway