आकाशवाणीतील वृक्षांना  कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण निरोप 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

पुणे ः पुणे मेट्रोच्या कामासाठी अनेक मोठमोठ्या वृक्षांचे स्थलांतर करण्यात येत असून, गुरुवारी शिवाजीनगर येथील आकाशवाणी केंद्रातही ते करण्यात आले. त्या वेळी वृक्षांना निरोप देण्याच्या कार्यक्रमात आकाशवाणीतील कर्मचाऱ्यांच्या भावना दाटून आल्या. त्यांनी वृक्षांसोबत असलेलं आपलं नात व्यक्त केलं. 
 
उद्‌घोषिका प्रभा जोशी म्हणाल्या, ""आकाशवाणीत शिरताच कोकीळ, सुतार पक्षी, पोपट आदी विविध रंगबिरंगी पक्ष्यांचा गलका कानी पडायचा. त्यांच्या किलबिलाटाने मन अगदी प्रसन्न होत होतं.'' 
वृत्तनिवेदक मनोज क्षीरसागर म्हणाले, ""ही झाडे आकाशवाणीचाच एक अविभाज्य भाग बनली होती. आकाशवाणीच्या कॉलनीतच या झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे, यातच समाधान आणि आनंद आहे.'' 
वृत्त विभागाचे उप संचालक नितीन केळकर, तसेच स्वाती महाळंक यांनीही त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. या वेळी आकाशवाणीचे उप महानिदेशक आशिष भटनागर, केंद्र निदेशक गोपाल औटी, गौरी लागू आदी उपस्थित होते. 
दरम्यान, आकाशवाणी परिसरातील 22 मोठ्या वृक्षांचे स्थलांतर करण्यात येणार असून, गणेशखिंड येथील आकाशवाणी कॉलनीत ती लावली जाणार आहेत, अशी माहिती मेट्रोचे अधिकारी अतुल गाडगीळ यांनी दिली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A passionate message to the trees in the sky.