पासपोर्ट कार्यालयात गैरसोय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 जानेवारी 2019

बारामती शहर - येथील टपाल कार्यालयातील पासपोर्ट कार्यालयाचे कामकाज वेळेत सुरू होत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. 

या कार्यालयातील कर्मचारी सकाळी नऊ वाजता येणे अपेक्षित होते. मात्र, संबंधित कर्मचारी आज अकराच्या सुमारास बारामतीत पोहोचला. त्यामुळे चाळीसहून अधिक लोकांना त्याच्यासाठी ताटकळत राहावे लागले. सासवडहून येण्यासाठी बसच न मिळाल्याने उशीर झाल्याचे या कर्मचाऱ्याने उद्धटपणे सांगत, ‘तुम्हाला काय करायचे ते करा,’ अशी भाषा वापरली. त्यामुळे पासपोर्टच्या कामासाठी आलेल्या लोकांनी संताप व्यक्त केला. 

बारामतीच्या टपाल कार्यालयात पासपोर्ट विभागाचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. त्यात पासपोर्ट विभागाचा एक; तर टपाल विभागाचा एक कर्मचारी आहे. त्यापैकी पासपोर्ट विभागाचा कर्मचारी वेळेत हजर होतो. 

मात्र, टपाल कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांकडून वारंवार बेफिकीरपणा दाखविला जातो. त्यामुळे हे कार्यालय कधीच वेळेत सुरू होत नाही, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. आज सकाळी याचा प्रत्ययच आला. सकाळी नऊ वाजल्यापासून लोक ताटकळत असताना विजय गायकवाड नावाचे टपाल विभागामधील कर्मचारी अकराच्या सुमारास कार्यालयात आले. उशिरा आल्यानंतरही त्यांच्या कॅमेऱ्याचा सेटअप नीट होत नव्हता. त्यामुळे लोकांना आणखी ताटकळत राहावे लागले.

कर्मचाऱ्याचा उद्धटपणा
या कार्यालयात तक्रारपुस्तक ठेवलेले नसल्याचे समोर आले. तसेच, उशिराबाबत विचारणा केली असता, ‘मला बसच मिळाली नाही, त्याला मी तरी काय करू? त्यामुळे उशीर झाला. तासाभराने काय फरक पडतो?’ अशी उत्तरे गायकवाड यांनी दिली. त्यामुळे लोक अचंबित झाले. मात्र, काम करून घ्यायचे असल्याने निमूटपणे सर्वांनीच नमती भूमिका घेतली.

सदर कर्मचारी हा पुणे कार्यालयाच्या अखत्यारीत असल्याने याबाबत पुण्यातच बोलावे लागेल.
- अमेय निमसुडकर, पोस्ट मास्तर, बारामती

Web Title: Passport Office Inconvenience