पतंगराव कदमांचा जीवनप्रवास युवकांसाठी प्रेरणादायी....

राजकुमार थोरात
रविवार, 11 मार्च 2018

२००९ च्या विधानसभा निवडणूकीमध्ये हर्षवर्धन पाटलांच्या प्रचाराची सभा पतंगराव कदम यांनी  जंक्शन मध्ये गाजवली होती. या निवडणूकीमध्ये बंडखोर उमेदवारांना घरचा रस्ता दाखविण्याचे आवाहन केले होते.या निवडणूकीमध्ये माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटलांचा विजय झाला होता

वालचंदनगर - माजी मंत्री पतंगराव कदमांचे झालेल्या निधनाची बामती इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील नागरिकांच्या मनाला चटका लावून गेली.

माजी मंत्री पतंगराव कदम व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे जिव्हाळ्याचे संबध होते.दोघांनी एकाच पक्षामध्ये अनेक वर्ष काम केले होते.  २००९ च्या विधानसभा निवडणूकीमध्ये हर्षवर्धन पाटलांच्या प्रचाराची सभा पतंगराव कदम यांनी  जंक्शन मध्ये गाजवली होती. या निवडणूकीमध्ये बंडखोर उमेदवारांना घरचा रस्ता दाखविण्याचे आवाहन केले होते.या निवडणूकीमध्ये माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटलांचा विजय झाला होता. पतंगराव कदम दुसऱ्यांदा नोंव्हेबर २०१५ साली खंडकरी शेतकऱ्याचे प्रतिनिधी बी.डी.पाटील यांच्या पंच्चाहत्तरीच्या कार्यक्रमाला  आले होते. बी.डी. पाटील व पतंगराव एकमेकांचे वर्गमित्र होते. पंच्चाहत्तरीच्या कार्यक्रमाला आल्यानंतर त्यांनी वालचंदनगरमधील  कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करुन कार्यकर्त्यांनी आळस झटकून पक्षासाठी काम करण्याचे आवाहन केले होते.

वालचंदनगर कंपनीने सुमारे १७ वर्षापूर्वी कडेपूर (ता.कराड) येथील सोनहिरा साखर कारखान्याची उभारणी करुन दिली होती.वालचंदनगरमध्ये येताच  कदम यांनी वालचंदनगर कंपनीने बनविलेला  ‘ सोनहिरा ’ साखर कारखान्याची आठवण झाली.  वालचंदनगर ने बनविलेला साखर कारखाना सोने हिऱ्यासारखा चांगला चालत असल्याचे सांगून  कंपनीचे व कामगारांचे कौतुकही केले होते. यासंदर्भात खंडकरी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी बी.डी.पाटील यांनी सांगितले की, पतंगराव हे माझे वर्ग मित्र होते. १९६० सातारा कॉलेजमध्ये बी.ए.च्या पहिल्या वर्षाला आम्ही एकत्र शिक्षण घेतले. स्पष्ठ व परखड बोलण्याचा स्वभाव त्यांचा पहिल्यापासुनच होता. संघटन कौशल्य ही त्यांनी मिळालेली देवाची देणगी होती. शिक्षक ते विद्यापीठाचे कुलगुरुपर्यंत त्यांचा प्रवास आजच्या युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

Web Title: patangrao kadam pune news