मऊ मेणाहुनी आम्ही पण कठिण वज्रास भेदु- ह.भ.प.पातकर महाराज

रमेश मोरे
शनिवार, 16 जून 2018

जुनी सांगवी - मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदु संत त्यांच्या जिनवात विविध आघात सहन करतात, पण उगीच काही कारण नसता जर लोकानी त्रास दिला तर त्याचे प्रती उत्तर देणे भाग आहे. असा भाव असलेल्या अभंगावर किर्तनसेवेतुन ह.भ.प.श्रीकांत महाराज पातकर यांनी जुनी सांगवी येथे व्यक्त केले. ते किर्तनसेवेत पुढे म्हणाले, खरे तर संत कृपालु असतात, दया, क्षमा, शांती हे संतांचे आचरण आसते.

जुनी सांगवी - मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदु संत त्यांच्या जिनवात विविध आघात सहन करतात, पण उगीच काही कारण नसता जर लोकानी त्रास दिला तर त्याचे प्रती उत्तर देणे भाग आहे. असा भाव असलेल्या अभंगावर किर्तनसेवेतुन ह.भ.प.श्रीकांत महाराज पातकर यांनी जुनी सांगवी येथे व्यक्त केले. ते किर्तनसेवेत पुढे म्हणाले, खरे तर संत कृपालु असतात, दया, क्षमा, शांती हे संतांचे आचरण आसते. जुनी सांगवी मारुती मंदिरात भावार्थ रामायण पारायण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असुन रोज सकाळी श्री भावार्थ रामायण सामुदियक पठण व सदर सप्ताहात संत तुकोबामहाराजांचे नाट अभंग या एकाच अभंग विषयावर सात दिवस चिंतन व किर्तन सप्ताहाचे येथे आयोजन करण्यात आले आहे. येथील नामदेव महाराज मंदीरात सकाळी सामुदायिक पारायण व संध्याकाळी मारूती मंदीर येथे शुक्रवार ता.२२ पर्यंत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

यानेळी किर्तन सेवेत गायन साथ अशोक मोरे सर, विश्वनाथ सपकाल, जयवंत चांदेरे तसेच मृदंग साथ गुरु कुलकर्णी, अमर रोकडे यांनी केली.श्री आप्पा काळेबेरे, अखिल शिंम्पी समाज, श्री राजाराम कड यांनी सप्ताहाते संयोजन केले आहे.

Web Title: patarkar maharaj kirtan