कात्रज घाट रस्त्यावर बांधकामाचा राडारोडा आणि कचरा

महेंद्र शिंदे
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

खेड-शिवापुर (पुणे) : गेल्या काही दिवसांपासून घाट रस्त्यावर बांधकामाचा राडारोडा आणि कचरा मोठ्या प्रमाणात टाकला जात आहे. या कचरा आणि राडारोड्याच्या ढिगाला वाहने धडकून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. याठिकाणी राडारोडा टाकणाऱ्यांवर सार्वजनिक बांधकाम विभागाने कारवाई करावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत. 

कात्रज घाट रस्त्याच्या डांबरिकरणाचे काम मोठ्या प्रमाणात पूर्ण झाले आहे. त्यामुळे घाट रस्ता सुरळीत झाला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या डांबरीकरण झालेल्या रस्त्यावर कचरा आणि बांधकामाच्या राडारोड्याचे ढिग टाकले जात आहेत. त्यामुळे घाट रस्त्याचे बकालीकरण झाले असून कचऱ्यामुळे घाटात दुर्गंधी पसरली आहे. पुणे महापालिकेच्या रस्त्याचे काम करणारा एक ठेकेदार बांधकामाचा राडारोडा कात्रज घाट रस्त्यावर टाकत आहे. तर परिसरातील हॉटेल चालक हॉटेलमधील कचरा रात्रीच्या वेळी या घाट रस्त्यावर टाकतात. 

या राडारोड्यामुळे घाटातून वाहन चालविताना अपघाताचा धोका निर्माण झाला असून कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरीक हैराण झाले आहेत. या राडारोड्यामुळे घाट रस्त्याचे चर बुजले आहेत. त्यामुळे घाट रस्त्यावर राडारोडा आणि कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत. 

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता, पुण्यात रस्त्याचे काम करणाऱ्या या ठेकेदाराने घाट रस्त्यावर हा राडारोडा टाकला आहे. त्याच्याविरोधात पोलिसात आम्ही तक्रार केली आहे. मात्र दोन दिवसात त्याने हा राडारोडा उचलण्याचे कबुल केले आहे. दोन दिवसानंतर राडारोडा असाच राहिला तर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: on the path of ghat raw material problem for vehicles