कोरेगावकरांची चिंता पुन्हा वाढली; पॅथॉलॉजी टेक्निशियनच निघाला पॉझिटिव्ह 

कोरेगावकरांची चिंता पुन्हा वाढली; पॅथॉलॉजी टेक्निशियनच निघाला पॉझिटिव्ह 

कोरेगाव भीमा (पुणे) : येथील दत्तनगरमधील एक रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने एकीकडे आनंदाचे वातावरण आहे, तर दुसरीकडे एका पॅथॉलॉजी टेक्निशियनसह दोघे जण कोरोनाबाधित निघाले. सध्या कोरोना बाधितांची संख्या सातवर गेल्याने कोरेगावकरांची चिंता पुन्हा वाढली असून, या टेक्निशियनच्या संपर्कात आलेल्यांची माहिती आरोग्य विभागाकडून घेण्यात येत आहे.

कोरेगावात दत्तनगरमधील कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरा झाल्याने शनिवारी (ता. 11) सायंकाळी उशिरा घरी परतला. या रुग्णाचे दत्तनगरमधील नागरिकांनी उत्साहात स्वागत केले. तसेच, त्याच्या कुटुंबाची काळजी शेजारी राहणारे शिवसेना जिल्हा सल्लागार अनिल काशिद व इतर शेजारी घेत आहेत. एकीकडे रुग्ण बरा झाल्याचा आनंद साजरा करीत असताना गावातीलच एक पॅथॉलॉजी टेक्निशियनसह आणखी एक कामगार कोरोनाबाधित निघाल्याने प्रशासनाचीही चिंता वाढली आहे. हा टेक्निशियन अनेकांच्या संपर्कात आल्याची शक्यता असल्याने संबधितांची माहितीही आरोग्य विभागाकडून घेण्यात येत आहे.

दरम्यान, ग्रामपंचायत प्रशासनाने गावात भाजीपाला, फळविक्रीस येत्या १७ तारखेपर्यंत पूर्णतः बंदी केली आहे. औद्योगिक, वैद्यकीय आस्थापना व शासकीय कार्यालय सोडून सर्व प्रकारच्या आस्थापना, दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, नियम मोडणाऱ्यांवर कारवाईही सुरू केली आहे. कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच संगिता कांबळे, उपसरपंच योगेश गव्हाणे, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस तसेच, समितीच्या अध्यक्षा तलाठी अश्विनी कोकाटे, पोलिसपाटील मालन गव्हाणे हे पोलिस यंत्रणेसह परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.

Edited by : Shivnandan Baviskar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com