पठ्ठे बापूराव राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ संपन्न

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 नोव्हेंबर 2018

हडपसर (पुणे) : ''गालावरील खळी, डोळ्यांच्या पापण्यांची हालचाल, नृत्य, अदाकारी या माध्यमातून मनुष्य जीवनातील विविध रंग व पैलू लोककलावंत उलगडून दाखवतात. गाण्यांमधील नेत्र कटाक्षाने भले भले घायाळ होतात. हे हिंदीमध्ये चालते मग मराठीत का नाही ? तिथे नाके मुरडू नका. तमाशा हे लोकरंजनाचे साधन आहे. तमाशा व लोककलेबद्दल मला ममत्व आहे. महाराष्ट्राची ही लोककला समृद्ध होण्यासाठी कलावंतांचा उचित सन्मान होणे गरजेचा आहे,'' असे आवाहन माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी केले.

पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान व सांस्कृतिक कला मंडळाच्या वतीने देण्यात येणाऱया राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आलेला होता, याप्रसांगी पाटील बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार उल्हास पवार, सिने अभिनेत्री लीला गांधी, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले, डॉ मिलिंद भोई, नाट्यपरिषदेचे प्रकाश पायगुडे, सुरेश घुले, माजी महापौर प्रशांत जगताप, नगरसेविका कालिंदा पुंडे, नगरसेवक मारुती तुपे, विकास रासकर, प्रतिष्ठानचे संस्थापक जयप्रकाश वाघमारे, कार्याध्यक्ष सत्यजित खांडगे, महोत्सव समिती अध्यक्ष मित्रावरुण झांबरे, रेश्मा परितेकर, आकाश वाकचौरे, सहाय्यक पोलीस आयुक्त अंबुरे, वसंतराव सोनवणे, श्रीधर जिंतीकर, संतोष जगताप, भरत हगवणे, नाना नलावडे, ज्योतिबा उबाळे, मधुकर गुरव आदी मान्यवर उपस्थित होते. 

ज्येष्ठ तमाशा कलावंत रेखा काळे नेर्लेकर यांना पठ्ठे बापूराव पुरस्कार स्वरूप एकवीस हजार रुपये स्मृती चिन्ह देऊन सन्मानित केले. डॉ भास्करराव खांडगे पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री जयमाला इनामदार यांना व बापूसाहेब जिंतीकर पुरस्कार शाहीर देवानंद माळी यांना प्रत्येकी अकरा हजार रुपये, स्मृतीचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.

''शाहिर हा महाराष्ट्राचा श्वास आहे. एकेकाळी याच शाहिरांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले, संयुक्त महाराष्ट्र व अनेक आंदोलनात शाहीरांना महत्वाची भूमीका निभावली, '' अशा शब्दात शाहीर देवानंद माळी यांनी लोककले बद्दल आदर व्यक्त केला.

''पुरस्काराची रक्कम ही महत्त्वाची नसते ज्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो ते महत्त्वाचे असते. लोककलेसाठी ज्यांचे  मोठे योगदान आहे असे नामवंत कलावंत, साहित्यिक, अभ्यासक यांच्या नावाने पुरस्कार मिळणे हे आम्हा कलावंतांचे भाग्याच आहे. ''अशा भावाना ज्येष्ठ अभिनेत्री जयमाला इनामदार यांनी व्यक्त केल्या. प्रास्ताविक कार्याध्यक्ष सत्यजित खांडगे यांनी केले.स्वागत संस्थापक जयप्रकाश वाघमारे यांनी केले. आभार रेश्मा परितेकर यांनी मानले.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Paththe Bapurao State Level Award Distribution ceremony