अखेर कोरोनाने भेदले हवेलीतील या गावाचे सुदर्शनचक्र 

जनार्दन दांडगे
सोमवार, 29 जून 2020

उरुळी कांचन, कुंजीरवाडी, कदमवाकवस्ती, कोरेगाव मूळ व लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत कोरोनाचे वीसहुन अधिक रुग्ण आढळले होते. मात्र, या गावांच्या मधोमध असतानाही कोरोनापासून सोरतापवाडी गाव दुर राहिले होते.

लोणी काळभोर (पुणे) : हवेली तालुक्यातील सोरतापवाडी परिसरात रविवारी (ता. २८) रात्री उशिरा एक चव्वेचाळीस वर्षीय रुग्न कोरोनाबाधित आढळून आला आहे. कोरोना येऊ नये, यासाठी मागिल साडेतीन महिन्यांपासून सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांनी विविध उपयायोजना करूनही अखेर गावात कोरोनाचे आगमन झाले. 

खेकडे, मासे पकडणाऱ्यांच्या हाती आले टॅब

कुंजीरवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. मेहबूब लकडे यांनी सोरतापवाडी परिसरात कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. सोरतापवाडी परिसरातील कोरोनाबाधित रुग्णावर लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात उपचार चालू असून, संबधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या पाच जणांना होम क्वारंटाइन करण्यात येणार असल्याचेही डॉ. लकडे यांनी स्पष्ट केले. 

शिरूर- हवेलीतील कुटुंबांना माहेरचा आधार

पूर्व हवेलीमधील उरुळी कांचन व लोणी काळभोर परिसरात मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात कोरोनाचे तीन रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर सोरतापवाडी वगळता उरुळी कांचन, कुंजीरवाडी, कदमवाकवस्ती, कोरेगाव मूळ व लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत कोरोनाचे वीसहुन अधिक रुग्ण आढळले होते. मात्र, या गावांच्या मधोमध असतानाही कोरोनापासून सोरतापवाडी गाव दुर राहिले होते. त्यासाठी सोरतापवाडीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत प्रशासनाने घेतलेली काळजी कारणीभूत ठरली होती. मात्र, रविवारी रात्री उशिरा कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला. त्यामुळे सोरतापवाडीही कोरोनाग्रस्त गावांच्या यादीत जाऊन बसली आहे. 

दिव्यांग विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण

याबाबत डॉ. मेहबूब लकडे यांनी माहिती दिली की, सोरतापवाडी परिसरातील एका चव्वेचाळीस वर्षीय व्यक्तीला सर्दी, ताप यासारखी लक्षणे जाणवू लागली होती. त्यामुळे त्यास लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्या ठिकाणी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली. संबंधित रुग्ण हा मागिल दोन महिन्यांपासून घऱीच होता. मात्र, त्याची सासू व मेहुणा पुण्यातून मागिल काही दिवसांपासून रुग्णाच्या घऱी राहण्यासाठी आले होते. त्यांच्यामुळे त्याला कोरोना झाला की अन्य कारणाने, याची माहिती घेण्याचे काम चालू आहे. या रुग्णाच्या संपर्कात आलेले त्याचे आई, वडील, पत्नी, सासू व मेहुण्यास होम क्वारंटाइन करण्यात येणार आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

उरुळी कांचन शहरात जनता कर्फ्यू
मागिल काही दिवसात उरुळी कांचन व परिसरात कोरोनाचे चार रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे उरुळी कांचन ग्रामपंचायत प्रशासनाने सोमवारपासून (ता. २९) पुढील तीन दिवस जनता कर्फ्यू लागू केला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उरुळी कांचन व परिसरातील आरोग्यसेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवले असल्याची माहिती उरुळी कांचनच्या सरपंच राजश्री वनारसे व उपसरपंच भाऊसाहेब कांचन यांनी दिली. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A patient of Corona was found at Soratapwadi in Haveli taluka