पिवळे रेशन कार्ड, उत्पन्न दाखल्यावरही रुग्णांना प्रवेश

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

पुणे - उत्पन्नाचा दाखला अथवा पिवळे रेशन कार्ड याशिवाय रुग्णालयात दाखल होण्यासाठी कोणत्याही स्वरूपाचा पुरावा मागू नये, असे आदेश जिल्हा प्रशासनाने धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी झालेल्या रुग्णालयांना दिले आहेत. त्यामुळे कागदपत्रे पुरेशी नाहीत, असे कारण देऊन प्रवेश नाकारणे योग्य नाही.

धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी झालेल्या रुग्णालयांमध्ये दारिद्य्ररेषेखालील नागरिकांना मोफत उपचार करण्याचे बंधन राज्य सरकारने घेतले आहे. त्यासाठी रुग्णालयाच्या उत्पन्नाच्या दोन टक्के रक्कम अशा रुग्णांवर खर्च करणे बंधनकारक आहे; परंतु अनेक रुग्णालये या आदेशाचे पालन करीत नाहीत. या संदर्भात जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यावर निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांनी रुग्णालयाच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. त्यामध्ये त्यांनी या सूचना दिल्या.

मुठे म्हणाले, ‘‘तक्रारी पुन्हा आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत; तसेच रुग्णालयांमध्ये या संदर्भातील डिजिटल बोर्ड लावण्याच्या सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. मात्र अनेक रुग्णालयांनी ते लावले नाहीत. ते त्वरित लावण्याच्या सूचनाही त्यांना देण्यात आल्या आहेत.’

Web Title: patient entry on yellow ration card & income proof