जम्बो कोविड हॉस्पिटलमधील डॉक्‍टरांबद्दल रुग्णाच्या भावना 

जम्बो कोविड हॉस्पिटलमधील डॉक्‍टरांबद्दल रुग्णाच्या भावना 

पुणे - पंढरीच्या विठ्ठलावर सगळा भार सोपवून आम्ही नवरा-बायकोनी हॉस्पिटलमध्ये पाऊल टाकलं. सासवडमधून निघालो त्या वेळी चालता येत नव्हतं की, बोलता. पण, अवघ्या अठरा तासांमध्ये आम्हाला जगण्याचा विश्वास अन्‌ श्‍वास दिला पुण्यातील जम्बो कोविड हॉस्पिटलमधील डॉक्‍टरांनी. त्यांनी घातलेल्या पांढऱ्या रंगाच्या "ड्रेस'मध्ये आम्हाला आमचा सावळा विठ्ठल दिसला. 

पुण्यापासून जेमतेम चाळीश किलोमीटर अंतरावरच्या माहूर (ता. पुरंदर) गावातील शेतकरी दांपत्य बोलतं होतं. ताप आलेला, त्यातच दम लागलेला, अजून काय होतंय हे नीट सांगताही येत नव्हतं. अशा स्थितीत सुरवातीला तालुक्‍याच्या सरकारी रुग्णालयात दाखल केलं. पण, काही केल्या बरं वाटत नव्हतं. त्यामुळे शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) मैदानावर उभारेल्या जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये मंगळवारी रात्री साडेसात वाजता दाखल केले. त्यावेळी त्यांची प्रकृती खालावली होतीच, पण त्याहीपेक्षा त्यांचा या आजारातून आपण बरे होऊ हा आत्मविश्वास गेला होता. हॉस्पिटलमधील डॉक्‍टरांना तातडीने प्रभावी उपचार सुरू केला. तुम्ही ठणठणीत बरे होऊन घरी जाऊ शकता, हा विश्वास उपचार करताना दाखवला. त्यामुळे पुढील अठरा तासांमध्ये ते स्वतःच्या पायावर आत्मविश्वासाने उभे राहिले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिवसभर शेतात काम करतायंच आणि संध्याकाळी भजनात तल्लीन व्हायचं हाच या दांपत्यांचा नित्यक्रम. पण, त्यातच या दांपत्याला कोरोनाचा संसर्ग झाला. विठ्ठलावर अढळ श्रद्धा असणारे हे दांपत्य जंबोमध्ये उपचारानंतर ठणठणीत बरे झाले. 

""येथे आल्यावर तातडीने उपचार सुरू केले. औषधे दिली. त्यातून एका रात्रीत फरक पडला. आता प्रकृती सुधारत आहे. आमच्या नवरा-बायकोला जवळच्या खाटा दिल्या आहेत. त्यामुळे एकमेकाच्या आधार देऊ शकतो. येथील जेवण चांगल आहे. पोषक आहार दिला जातो,'' अशी माहिती या दांपत्यांनी दिली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

91 वर्षीय रुग्ण कोरोनामुक्त 
शिवाजीनगर येथील जम्बो कोविड हॉस्पिटलमधून 91 वर्षीय रुग्णाने कोरोनाच्या संसर्गावर विजय मिळविला. त्यांनी तब्बल 25 दिवस करोनाशी झुंज दिली. त्यांना करोना विषाणूच्या संसर्गामुळे खोकला व श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने दम लागत होता. त्यामुळे त्यांना जम्बो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना रुग्णालयातून घरी सोडले आहे. जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये चांगली आरोग्य यंत्रणा असून, नाश्‍ता, जेवण, औषधे वेळेवर देण्यात येत होते. डॉक्‍टरांकडून वेळच्या वेळी तपासणी व विचारपूस करण्यात येत होती. तसेच, कुटुंबीयांशी नियमित संपर्क साधता येत होता, असे रुग्णाने सांगितले. त्यांच्या कुटुंबीयांनी जम्बो कोविड सेंटरमधील सर्व करोना योद्धे आणि प्रशासनाला मनोमन धन्यवाद दिले. महपौर मुरलीधर मोहोळ व मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी जम्बोमधील आरोग्य सेवकांची प्रशंसा केली. 

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com