मेेंदूत रक्ताच्या गाठी झालेल्या समीरला दिसला 'मार्ग'; मिळाली तीस हजारांची मदत

Patient Sameer Chavan got help of 30000 from Marga Foundation
Patient Sameer Chavan got help of 30000 from Marga Foundation

स्वारगेट (पुणे) : समीर चव्हाणच्या मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्या असून त्याला उपचारांसाठी आर्थित मदत गरजेची आहे, असे वृत्त सकाळने प्रकाशित केले होते. त्यानंतर मार्ग फॉउंडेशनतर्फे अध्यक्ष संतोष पवार यांनी समीर चव्हाण या तरुणाला 30,000 रुपये आर्थिक मदत केली. समीर चव्हाण यांना ही मदत प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन  फॉउंडेशनचे सचिव सुनील राठोड, खजिनदार लहु चव्हाण यांनी  समीर चे वडील सुभाष चव्हाण यांच्या हाती चेक देण्यात आला.

समीर चव्हाण या तरुणाच्या मेंदूत रक्ताच्या गाठी सापडल्याचे निदान झाले होते, त्याच्या उपचारासाठी मोठा खर्च येणार होता. त्याच्या डोक्याची अर्धी कवटी बसवणे गरजेचे आहे. समीरच्या वडिलांनी त्यांचे घर विकले आहे. समीरचे वडील ट्रक ड्राइव्हर होते. त्यांनी आपल्या आयुष्याची सर्व कमाई मुलाच्या पहिल्या ऑपेरेशनसाठी खर्च केली. स्वतःचे घर विकले. समीरचे आणखी एक ऑपेरेशन करणे अत्यंत गरजेचे आहे. आर्थिक स्थिती अत्यंत बिकट असल्यामुळे ते या ऑपेरेशनची व्यवस्था करण्यासाठी झटत आहेत. त्यांनी ट्रक चालकाची नोकरी पण सोडली कारण समीरच्या उपचाराची व्यवस्था करण्यासाठी ते दारोदारी फिरत आहेत. हे वृत्त सकाळने प्रकाशित केल्यानंतर मार्ग फाऊंडेशनने  समीरला मदत केली. 

सध्या समीरचे आई वडिल पुण्यातील चिखली येथे एक सिंगल रूममध्ये राहतात. तिथे समीर ची योग्य सोई होऊ शकत नसल्याने त्यांनी समीरला त्यांच्या साडूकडे जे आळंदी येथे राहतात त्यांच्याकडे ठेवलेले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com