मुळशी तालुक्यातील या गावांमध्ये आज आढळले रुग्ण  

corona1
corona1

पिरंगुट (पुणे) : मुळशी तालुक्यात आज कोरोनाचे तेरा रुग्ण सापडले असून, तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता २४९ झाली आहे.  

मुळशी तालुक्यात आज मारुंजी व भूगाव येथे प्रत्येकी चार , घोटावडे येथे तीन, तर हिंजवडी व कासार आंबोली येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. आज कोरोना आजारातून बरे होऊन घरी  गेलेल्यांमध्ये सात रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे तालुक्यात बरे होऊन घरी सोडलेल्या रुग्णांची संख्या ७५ झाली आहे. आज तालुक्यात एकाही मृत्यूची नोंद नाही. तालुक्यातील मृतांची संख्या आजअखेर पाच असून, घरी सोडलेले रुग्ण वगळता तालुक्यात आता एकूण १७० रुग्ण कोरोनाबाधित आहे. त्यांतील दोघेजण अद्याप अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.  त्यामुळे कोरोनाच्या मुळशीकरांची चिंता वाढतच चालली आहे.  

मुळशी तालुक्यात ठिकठकाणी आजपासून शासकीय लॅाकडाउन सुरू झाला असून, सर्वत्र रस्त्यावर शुकशुकाट होता. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने अत्यल्प प्रमाणात वर्दळ होती. मात्र, तालुक्यातील औद्योगीक क्षेत्रातील कंपन्या चालूच होत्या. कामगारांची ये जा सुरू होती.                   
    
Edited by : Nilesh Shende

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com