राष्ट्रभक्ती कृतीतून दिसली पाहिजे : सेवानिवृत्त कर्नल रघुनाथन नांबियार

daund
daund

दौंड (पुणे) : शिस्त हा लष्कराचा आत्मा आहे. जे कार्य आपण करत आहात ते शिस्तीने, पूर्ण तन्मयतेने व निष्ठेने करावे. राष्ट्राभिमान व राष्ट्रभक्ती आपल्या कृतीतून दिसली पाहिजे, असे आवाहन पंजाब मधील अॅापरेशन ब्ल्यू स्टार या लष्करी कारवाईत सहभागी झालेले सेवानिवृत्त कर्नल रघुनाथन नांबियार यांनी केले आहे. 

रोटरी क्लब आॅफ दौंडच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या `लष्करी जीवन` या विषयावरील व्याख्यानात रघुनाथन नांबियार यांनी हे आवाहन केले. क्लबचे अध्यक्ष मनोहर बोडखे, सचिव प्रमोद खांगल, डॅा. फिलेमोन पवार, डॅा. संजय इंगळे, अविनाश हरहरे, शालिनी पवार, सायली शहा, आदी या वेळी उपस्थित होते. 

रघुनाथन नांबियार म्हणाले, ``लष्करात जेव्हा जवान रूजू होतो तेव्हाच त्याने स्वत:ला राष्ट्रासाठी समर्पित केलेले असते. खडतर प्रशिक्षणातून जवान सज्ज होतो. लष्करी जवान कोणतीही विशेष अपेक्षा न बाळगता स्वत : चा जीव धोक्यात घालून वाळवंटात, उणे तापमान असलेल्या हिमालय पर्वतरांगात आणि देशाच्या विविध भागात कर्तव्य बजावत आहे व बजावत राहीन.`` 

ते पुढे म्हणाले, ``राष्ट्रासाठी जे लढत आहेत, जे सीमेचे रक्षण करीत आहेत व जे आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी सदैव पुढे असतात अशा लष्करी दलातील अधिकारी व जवानांचा सदैव आदर करा.`` 

पंजाब रेजीमेंटचे रघुनाथन नांबियार हे सियाचिन येथे १९८५ मध्ये शत्रू राष्ट्राने केलेल्या गोळीबारात गंभीररित्या जखमी झाले होते. विविध पदकांचे मानकरी आणि आंतरराष्ट्रीय युध्द अभ्यास पथकांचे नेतृत्व करणारे श्री. नांबियार कर्नल पदावर सेवानिवृत्त झाले आहेत. 

लष्कर म्हणजे जीवनाचा अंत नाही...
लष्करात भरती होण्यास इच्छूक असलेल्या युवकास `तिकडे मरायला जायचे आहे का ? `, असे सहजपणे सांगून हिणवले जातात. माहिती न घेता लष्कराविषयी चुकीची भावना तयार केली जाते. लष्करात अनेक संधी आहेत आणि अधिकाधिक युवकांनी लष्करी सेवेत रूजू व्हावे, असे आवाहन रघुनाथन नांबियार यांनी केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com