पवना धरण परिसरात पावसाचा जोर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जुलै 2018

पवनानगर - गेल्या दोन दिवसांपासून मावळ व परिसरामध्ये पडत असलेल्या जोरदार पावसामुळे पवना धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे.

धरण परिसरात बारा तासांत १३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. एक जूनपासून १६८६ मिलिमीटर एवढा पाऊस झाला आहे. धरणाची पातळी २००७ फूट एवढी झाली असून धरणात ६९.३७ टक्के (पाच वाजेपर्यंत) पाणीसाठा झाला असल्याची माहिती पवना धरणाचे शाखा अभियंता ए. एम. गदवाल यांनी दिली. 

गेल्या दहा ते बारा दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे परिसरातील ओढे, नाले, ओहळ भरून वाहत असल्याने पवना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. रविवार (ता. १५) संध्याकाळपासून पावसाचा जोर वाढल्याने अनेक शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या रोडावली होती. 

बाजारपेठ असलेल्या पवनानगर चौकामध्ये तुरळक गर्दी दिसत होती. परिसरामध्ये पावसाचे व वाऱ्याचे प्रमाण जास्त असल्याने शेतकऱ्यांनी भातलावणीचे काम बंद करणे पसंत केले. गेल्या वर्षी आजच्या दिवसापर्यंत धरणात केवळ ५८.८३ टक्के पाणीसाठा झाला होता. पावसाचा जोर असाच राहिला तर येत्या चार दिवसांत धरण १०० टक्के भरण्याची शक्‍यता आहे.

झाड कोसळले
जोरदार पाऊस व वाऱ्यामुळे येळसे येथे पवनानगर कामशेत रस्त्यावर झाड कोसळले. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर येळसे येथील तरुणांनी हे झाड बाजूला केले. येळसेचे पोलिस पाटील सतीश ठाकर, सागर ठाकर, मनीष ठाकर, निखिल कालेकर, पंडित सावंत, नीलेश ठाकर यांनी झाडाच्या फांद्या तोडून ते बाजूला केले. त्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत झाली.

Web Title: pawana dam area rain water