‘पवना’त २० टक्‍के साठा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

पवनानगर - मावळ तालुक्‍यासह पिंपरी-चिंचवड शहर तसेच औद्योगिक परिसरात पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठा २०.६३ टक्के झाला आहे. पाऊस लांबणीवर पडल्याने पाणीकपातीचे संकट निर्माण होण्याची शक्‍यता आहे. 

जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात मान्सूनला सुरवात होते. परंतु जून अर्धा संपला तरी पावसाची चाहूल नाही. त्यामुळे भाताची रोपे वाय जाण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. पिंपरी-चिंचवडकरांना पाणीकपातीच्या संकटाला सामोरे जावे लागण्याची भीती आहे. पवना धरणातून अंदाजे प्रतिदिन २५ ते ३० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येते. सध्या धरणात १ हजार ७५७ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. तो ५५ दिवस पुरेल, असे पाटबंधारे विभागाने सांगितले. १ जूनपासून परिसरात ९४ मिलि पाऊस झाल्याची माहिती शाखा अभियंता मनोहर खाडे यांनी दिली.

पाणीसाठ्यात ४ कोटी लिटरने वाढ 
पवना धरणातून चाळीस हजार घनमीटर गाळ काढल्याने यंदा ४ कोटी लिटर पाणीसाठा वाढणार आहे. २० मे ते १० जूनदरम्यान धरणातून गाळ काढला. यामुळे धरणाच्या साठ्यात वाढ होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: pawana dam water lavel