कौटुंबिक न्यायालयातील जागेत "पे अँड पार्क' करा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

पुणे - कौटुंबिक न्यायालयाच्या इमारतीमध्ये "पे अँड पार्क' करा; पण पार्किंगच्या जागेचा वापर लवकर करा, अशी भूमिका दि पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनने घेतली आहे. शिवाजीनगर येथील नवीन इमारतीत कौटुंबिक न्यायालयाचे काम सुरू होऊन वर्ष होत आले, तरी पार्किंगची जागा अद्याप मोकळीच आहे. 

या पार्श्‍वभूमीवर असोसिएशनच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीने अध्यक्ष वैशाली चांदणे यांच्या नेतृत्वाखाली उच्च न्यायालय प्रशासनाची बुधवारी भेट घेतली. या इमारतीचे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. इमारतीत तळघर आणि पहिल्या मजल्यावर पार्किंगसाठी जागा आहे. न्यायालयात सध्या आठ कौटुंबिक न्यायालयांचे काम चालते. या ठिकाणी येणारे पक्षकार आणि वकील यांची वाहन उभे करण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही. त्यामुळे जिल्हा न्यायालयाच्या आवारात त्यांना वाहने उभी करावी लागत आहेत. मुळात जिल्हा न्यायालयातील जागा पार्किंगसाठी अपुरी आहे; तसेच वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर वाहने उभी करण्यास मनाई केली आहे. यामुळे विशेषत: पक्षकारांची अडचण होत आहे. 

पार्किंगचा प्रश्‍न गंभीर असून, या जागेचा वापर केला जात नसेल, तर "पे अँड पार्क' करण्यास आमची हरकत नाही, अशी भूमिका असोसिएशनने या वेळी व्यक्त केली. "पे अँड पार्क'मधून वकिलांना सवलत देण्याची मागणीही संघटनेने प्रशासनाकडे केली. 

Web Title: Pay and Park in the Family Court premises