Video : कमी वीज वापरूनही भरा जादा बिल

Electricity-Meter
Electricity-Meter

पुणे - ‘वीज जपून वापरा, विजेची बचत करा’ असे महावितरणकडून वारंवार सांगितले जाते. दुसरीकडे मात्र ‘जादा वीज वापर, कमी बिल अन्‌ कमी वीज वापर, जादा बिल,’ असे अजब सूत्रच महावितरणने नव्याने स्वीकारल्याचे दिसते. वीज दरवाढीच्या प्रस्तावाला महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने दिलेल्या मान्यतेवरून हा प्रकार समोर आला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कमी वापर अन्‌ जादा बिल
पूर्वी -
 ज्यांचा वीज वापर १०० युनिटपर्यंत आहे, त्यांना मार्चपर्यंत प्रतियुनिट ३.०५ पैसे या दराने १०० युनिटचे ३०५ रुपये, याशिवाय ९० रुपये स्थिर आकार, ६१ पैसे प्रतियुनिटनुसार ६१ रुपये इंधन समायोजन आकार, १ रुपये २८ पैसे प्रतियुनिट नुसार १२८ रुपये वहन आकार आणि वरील सर्व आकारांवर १६ टक्के वीज शुल्क म्हणजे ९३ रुपये ४४ पैसे असे ६७७ रुपये ४४ पैसे बिल येत होते.

आता - एक एप्रिलपासून वीजदरवाढ लागू केली. त्यामुळे आता प्रतियुनिट ३.४६ पैसे या दराने १०० युनिटचे ३४६ रुपये, याशिवाय १०० रुपये स्थिर आकार, १ रुपये ४५ पैसे या दराप्रमाणे प्रतियुनिटनुसार वहन आकार १४५ रुपये आणि वरील सर्व आकारावर १६ टक्के वीज शुल्क म्हणजे ९४ रुपये ५६ पैसे, असे ६८५ रुपये ५६ पैसे बिल भरावे लागणार आहे. परिणामी, ८ रुपये १२ पैसे प्रतिमहिना जादा बिल भरावे लागणार आहे. मात्र यातून इंधन समायोजन आकार रद्द केला आहे. तरीही चार प्रकारचे शुल्क आकारूनही दरमहा जादा वीजबिल येणार आहे.

जादा वापर अन्‌ कमी बिल
पूर्वी -
 ज्यांचा वीज वापर २०० युनिट आहे. तर त्यांना मार्चपर्यंत ३.०५ प्रतियुनिट या दराने १०० युनिटपर्यंत ३०५ रुपये आणि त्यापुढील १०० युनिटसाठी ६ रुपये ९५ पैसे प्रतियुनिटप्रमाणे ६९५ असे मिळून एक हजार रुपये वीज आकार, ९० रुपये स्थिर आकार, १०० युनिटपर्यंत ६१ पैसे प्रतियुनिटनुसार ६१ रुपये आणि त्यापुढील १०० युनिटसाठी प्रतियुनिट १ रुपये ८ पैसे नुसार १०८ रुपये असे मिळून १६९ रुपये इंधन समायोजन आकार, १ रूपया २८ पैसे या दराने २०० युनिटचे २५६ रूपये वहन आकार आणि वरील सर्व आकारावर १६ टक्के वीज शुल्क म्हणजे २४२ रुपये ४० पैसे असे एक हजार ७५७ रुपये ४० पैसे बिल येत होते. 

आता - एप्रिलपासून पहिल्या १०० युनिटसाठी ३ रुपये ४६ पैसे प्रतियुनिट या दरानुसार ३४६ रुपये, त्यानंतरच्या १०० युनिटसाठी ७ रुपये ४३ पैसे प्रतियुनिटप्रमाणे ७४३ असे मिळून १०८९ रुपये वीज आकार, १ रुपये ४५ पैसे प्रतियुनिटनुसार २९० रुपये वीज वहन आकार आणि वरील सर्व आकारांवर १६ टक्के वीज शुल्क म्हणजे २३६ रुपये ६४ पैसे आणि १०० रूपये स्थिर आकार असे एकूण एक हजार ७१५ रुपये ६४ पैसे बिल भरावे लागणार आहे. त्यामुळे २०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांच्या वीज बिलात दरमहा ४१ रुपये ७६ पैशांची बचत होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com