पुणे : मिळकतकर भरा, नाहीतर, घरासमोर वाजणार बँड 

Pay Income tax otherwise pay band will play in front of the house
Pay Income tax otherwise pay band will play in front of the house

पुणे : मिळकतकर वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी महापालिकेने वसुलीवर भर दिला असून, थकबाकी भरण्यास टाळाटाळ करणाऱ्यांच्या घरांसमोर बँड वाजविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. 

पुणेकरांनो, सिंहगडावर जाण्याचा प्लॅन करताय? मग, 'ही' बातमी वाचा

महापालिकेच्या उत्पन्नात हमखास भर घालणाऱ्या मिळकतकरातून यंदा अपेक्षित उत्पन्न मिळण्याची शक्‍यता धूसर झाली आहे. मिळकतकराची थकबाकी चार हजार कोटींच्या घरात आहे. गेल्या आठवड्यात केवळ एक हजार कोटी रुपये मिळकतकरातून जमा झाले आहेत. चालू आर्थिक वर्षासाठी 2 हजार 100 कोटी रुपयांचे उद्दिष्ट आहे. 
शहरात सुमारे नऊ लाख निवासी आणि व्यावसायिक मिळकती आहेत. त्यापैकी महिनाभरात 23 हजार 635 मिळकतींची पाहणी करण्यात आली असून, त्यातील 115 मिळकती 'सील' करण्यात आल्या आहेत. मिळकतदारांना वारंवार नोटिसा देऊनही कर भरत नसल्याने तो वसूल करण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. आर्थिक वर्ष संपण्यास चारच महिने राहिल्याने चालू आणि थकीत कर गोळा करण्यात येत आहे. पुढील चार महिने सतत ही कारवाई सुरू राहील, अशी माहिती महापालिकेचे सहआयुक्त विलास कानडे यांनी दिली. 

पुण्यातील 'या' रस्त्यावर सापडेना एकही स्वच्छतागृह

''चालू वर्षातील उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पावले उचलण्यात आली असून, त्यानुसार जादा अधिकारी-कर्मचारी घेऊन तपासणी मोहीम हाती घेतली आहे. जे लोक कर भरण्यास टाळाटाळ करीत आहेत, त्यांच्या घरांसमोर बँड वाजविण्यात येईल.'' 
- विलास कानडे, सहआयुक्त, महापालिका 
 
#Corruption सारे काही टेबलाखालून

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com