आदिवासी विद्यार्थीनींचा 13 जुलैला 'पायी शिक्षण संघर्ष मोर्चा'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जुलै 2018

टाकवे बुद्रुक (पुणे) : आदिवासी समाजाच्या शिक्षण हक्कासाठी, शासकीय आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थीनी पुणे ते नाशिक 'पायी शिक्षण संघर्ष मोर्चा घेऊन 13 जुलै पासून पुण्यातून निघणार आहे. सुमारे दहा हजार विद्यार्थी या पायी मोर्चात सहभागी होणार आहेत. मांजरी येथील शासकीय वस्तीगृहापासून निघाणार मोर्चा हडपसर, मुंढवा, कोरेगाव पार्क, येरवडा, नाशिकफाटा, भोसरी, चाकण, राजगुरुनगर, नारायणराव, आळेफाटा मार्गे नाशिककडे रवाना होईल. विविध मागण्यांसाठी मागील तीन चार वर्षांपासून विद्यार्थी झटत आहे. 

शासनाने 2017 ला आश्रम शाळा व वसतीगृहात पुरवल्या जाणाऱ्या वस्तूंचा निधी डीबीटी केला, 1018 ला जेवणाचा डीबीटी केला, अकोले तालुक्यातील 19 शाळा बंद केल्या, 42 आश्रमशाळेतील वर्ग बंद केले, पालघरच्या 129 शाळा बंद, आदिवासी भागातील 1300 शाळा बंद करण्याच्या निर्णायात आदिवासी भागातील शाळा अधिक आहेत .या अनुषंगाने डीबीटीच्या अंतर्गत प्रती विद्यार्थ्यांना दिला जाणारा निधी तुटपुंजा आहे, डिसेंबर 2011च्या शासन निर्णयाच्या 10 एप्रिल 2013च्या शुद्धीपत्रातील परिशिष्ट अ मधील नमूद बाबी मिळणे शक्य नसल्याने ही योजना बंद करावी. 

महाविद्यालयाचा वेळ, ठिकाण, अंतर याचे नियोजन करून मेसचं नियोजन करणे शक्य होत नसल्याने, वसतीगृहात खानावळी सुरू कराव्यात,6 जुलै 2017ला सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाची त्वरित अंमलबजावणी करून सबंधितावर कारवाई करावी, पेसा अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रातील सरकारी दप्तरी जागा त्वरित भराव्यात, वसतीगृहातील मंजूर कामे सुरू करावी, वसतीगृहे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सुरू करावी. एसआयटी मार्फत विद्यार्थ्यांकडून वसूल करण्यात येणारी शिष्यवृत्ती थांबवावी, समांतर पदवी, पदव्युत्तर तसेच व्यावसायिक शिक्षणासाठी शिष्यवृत्ती द्यावी, वसतीगृह प्रवेशासाठी जात प्रमाणपत्र सक्तीचे करावे, गृहपालांना नोव्हेंबर 2011 च्या शासन निर्णयानुसार प्र.क्र.171/, का 12च्या परिशिष्ट फ(१)नुसार कार्यालय प्रमुख म्हणून घोषित करावे, प्रधानमंत्री कौशल्य योजना वस्तीगृहात राबवावी, महागाई भत्त्याची वेळोवेळी वाढ करावी, प्रत्येक जिल्ह्य़ात ग्रंथालयाची निर्मिती करावी, आदिवासी विद्यार्थ्यांना अशा प्रकारे मोर्चा, अंदलोन करण्यासाठी भाग पाडणा-या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.गृहपाल वसतीगृहाच्या जवळ रहावे, महानगरपालिका हद्दीत प्रवासासाठी मोफत पास द्यावे, सर्व सूविधायुक्त संगणक कक्ष उभारावे, स्पर्धा परिक्षा साठी अकॅडमी प्रवेशासाठी योजना राबवावी, सर्व स्पर्धा प्रशिक्षण मार्गदर्शन वर्ग आदिवासी प्रशिक्षण व संशोधन संस्थे मार्फत घ्यावे आदि मागण्यांसाठी हा मोर्चा निघत आहे. 

भरत तळपाडे म्हणाले,"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, विधानसभेचे व विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते, मुख्य सचिव, आदिवासी विकास आयुक्त, यांच्या सह पोलीस प्रशासनाला या निवेदनाच्या प्रती दिल्या आहेत, पावसाळ्यात देखील सर्व आदिवासी विद्यार्थी या संघर्ष मोर्चात सहभागी होणार आहे.

Web Title: payi sangharsh morcha on 13 july of tribal students