मिळकतकराचा भरणा 78 टक्के "कॅशलेस' 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

पुणे - महापालिकेच्या मिळकतकर विभागात 304 कोटी रुपयांपैकी फक्त 22 टक्के रक्कम रोख स्वरूपात महापालिकेत भरण्यात आली आहे. उर्वरित 78 टक्के रक्कम "कॅशलेस' स्वरूपात जमा झाली. त्यामुळे महापालिकेकडे ऑनलाइनद्वारे करभरणा करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. 

याबाबत महापालिकेच्या मिळकतकर विभागाचे प्रमुख सुहास मापारी म्हणाले, ""नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने मिळकतकर जमा करावा, यासाठी विविध प्रयत्न सुरू आहेत. त्याला नागरिकांचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढ आहे. धनादेशाच्या स्वरूपात जमा झालेला कर लक्षात घेतला, तर कॅशलेस व्यवहाराचे प्रमाण तब्बल 78 टक्के झाले आहे.'' 

महापालिकेच्या वतीने ऑनलाइन व्यवहारांचे नागरिकांना प्रशिक्षण देता येईल का, याचा प्रयत्न सुरू आहे. यंत्राद्वारे मतदान करण्याबाबत जसे मतदारांना प्रशिक्षण देण्यात येते, त्याचप्रमाणे नागरिकांना ते रोख स्वरूपात पैसे जमा करण्यास आले, की त्यांना 
ऑनलाइन प्रशिक्षण देता येईल का, त्यासाठी काही कर्मचारी नियुक्त करता येतील का, याचा विचार सुरू असल्याचे मापारी यांनी सांगितले.

Web Title: Payment of 78% of the Cashless