वीजबिल भरणा केंद्र आजही सुरू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

२४ तारखेपर्यंत नोटा स्वीकारणार; थकबाकी भरता येणार

पुणे - थकबाकीमुक्तीसाठी सुरू असलेल्या ‘नवप्रकाश’ योजनेतील थकबाकी तसेच चालू वीजबिलांचा भरणा करण्यासाठी वीजग्राहकांकडून गुरुवारपर्यंत (ता. २४) जुन्या पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा महावितरण स्वीकारणार आहे. दरम्यान, पुणे परिमंडलातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र वीजग्राहकांच्या सोयीसाठी रविवारी (ता. २०) कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत.

राज्य शासनाच्या सूचनेनुसार २४ नोव्हेंबरपर्यंत घरगुती व वैयक्तिक ग्राहकांच्या वीजबिलासाठी जुन्या नोटा महावितरण स्वीकारणार आहे. यात थकबाकीमुक्तीसाठी सुरू असलेल्या ‘नवप्रकाश’ योजनेतील थकीत वीजबिलांसाठीही जुन्या ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा वीजबिल भरणा केंद्रात स्वीकारण्यात येणार आहेत. ‘नवप्रकाश’ योजनेतील वीजग्राहकांना मूळ थकबाकीची रक्कम भरण्यासाठी येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत ५ टक्के सूट देण्यात आलेली आहे. याशिवाय इतर वीजग्राहकांना थकबाकी तसेच चालू महिन्यांचे वीजबिल भरण्यासाठी जुन्या ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जाणार आहेत.

आगाऊ बिल स्‍वीकारणार नाही 
ग्राहकाचे वीजबिल जेवढ्या रकमेचे आहे, तेवढ्याच रकमेच्या जुन्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यात येतील व वीजबिलापोटी आगाऊ स्वरूपात (ॲडव्हान्स पेमेंट) स्वीकारण्यात येणार नाही. घरबसल्या ऑनलाइन वीजबिल भरण्यासाठी महावितरणचे www.mahadiscom.in संकेतस्थळ व मोबाईल ॲपची सुविधा उपलब्ध आहे.

Web Title: Payment of electricity bill starting today