वीजबिल भरणा केंद्रे 14 नोव्हेंबरच्या रात्री बारा वाजेपर्यंत सुरू राहणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

पुणे - वीजबिलासाठी जुन्या पाचशे, हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यासाठी राज्य शासनाने 14 नोव्हेंबरच्या रात्री बारा वाजेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार महावितरणतर्फे वीजबिलाची रक्कम भरण्यासाठी जुन्या पाचशे, हजारांच्या नोटा स्वीकारण्यात येणार आहेत.

सोमवारी (ता. 14) सार्वजनिक सुटी असली, तरी महावितरणची सर्व वीजबिल भरणा केंद्रे सुरू ठेवण्यात येणार आहेत. ही सर्व भरणा केंद्रे 13 नोव्हेंबरला सकाळी 10 ते रात्री 7 पर्यंत तसेच 14 नोव्हेंबरला सकाळी 10 ते रात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. वीजबिल जेवढ्या रकमेचे असेल तेवढ्या रकमेच्या जुन्या पाचशे, हजाराच्या नोटा स्वीकारण्यात येतील. त्यासाठी कोणतीही मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. तसेच वीजबिलापोटी आगाऊ स्वरूपात (ऍडव्हान्स पेमेंट) घेण्यात येणार नाही.

वीजग्राहकांना त्वरित वीजबिल भरता यावे, यासाठी आवश्‍यक पूर्वतयारीसह राज्यातील सर्वच केंद्रांवर महावितरणतर्फे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे कर्मचारी दिवसभर जुन्या नोटा स्वीकारण्यासाठी ग्राहकांचे अर्ज भरून देण्यास सहकार्य करतील. हे अर्ज महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात येत आहेत. याशिवाय ऑनलाइन वीजबिल भरणा करण्यासाठी महावितरणचे www.mahadiscom.in संकेतस्थळ व मोबाईल ऍपची सुविधादेखील उपलब्ध आहे. वीजग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Web Title: Payment of electricity bill will be 14 in November