मोदींची राजवट उलथून टाकावी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 जानेवारी 2019

पुणे - ‘‘देशाने राज्यघटनेचा स्वीकार केल्यापासून आतापर्यंतच्या अनेक राजवटी सत्तेवर येऊन गेल्या; परंतु त्यांनी घटनेच्या चौकटीमध्ये राहत काम केले; पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राजवट आल्यापासून ते घटनाबाह्य काम करत आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये सर्व विरोधकांनी एकत्र येऊन मोदींची राजवट उलथून टाकावी,’’ असे मत माजी न्यायाधीश पी. बी. सावंत यांनी व्यक्त केले.

देश बचाव आघाडीतर्फे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्र सेवा दलाच्या आवारात ‘युवा जागर परिषद’ आयोजिली होती. त्यामध्ये ते बोलत होते. देश बचाव आघाडीसह विविध संघटनांनी या परिषदेचे आयोजन केले होते. या वेळी माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे-पाटील, कामगार नेते बाबा आढाव, ‘लोकायत’च्या अलका जोशी, संभाजी ब्रिगेडचे प्रभाकर कोंढाळकर, सुराज्य सेनेचे प्रा. सुभाष वारे, दलित स्वयंसेवक संघाचे दादासाहेब सोनवणे, महाराष्ट्र ॲक्‍शन कमिटीचे जाहिद शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

सावंत म्हणाले, ‘‘नरेंद्र मोदी यांच्या काळामध्ये घटनेतील मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्वांची पायमल्ली झाली. सरकारी संस्थांचे स्वातंत्र्य आणि स्वायत्तता हिरावून घेत त्यांच्यावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे.’’

पुणेरी पगडी कशासाठी?
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवीप्रदान कार्यक्रमाचा ड्रेस कोड बदलून पुणेरी पगडी आणली; पण या पगडीचे देशासाठी योगदान काय? देशाच्या स्वातंत्र्यामध्ये पुणेरी पगडी होती का? सावित्रीबाईंच्या नावाने सुरू असणाऱ्या विद्यापीठात पुणेरी पगडी कशासाठी, असे प्रश्‍न आढाव यांनी विचारले. 

बेरोजगारीची समस्या भयंकर
मोदी सत्तेत आल्यानंतर दीड कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. साडेचार वर्षांत नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या नाहीत. त्यामुळे देशात बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. शिपाई पदाच्या परीक्षेलाही लाखो विद्यार्थी अर्ज करतात. यामध्ये पीएचडी, डॉक्‍टर आणि इंजिनिअरही असतात. यावरून बेरोजगारीची समस्या किती भयंकर झाली, असे कोळसे-पाटील यांनी सांगितले.

Web Title: PB Sawant Talking on Modi Government Politics