दक्षिण-उत्तर भागासाठी बीआरटी

ज्ञानेश्‍वर बिजले
शनिवार, 2 जून 2018

पिंपरी - काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता या दरम्यान बीआरटी बसमार्गाचे काम या महिनाअखेरीला पूर्ण होत असून, जुलैमध्ये येथील बससेवा प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज होईल. शहराचा दक्षिण-उत्तर भाग या बससेवेने जोडला जाणार असल्याने या रस्त्यावरून बसगाड्यांचे नवीन मार्ग आखावे करावे लागणार आहेत.

पिंपरी - काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता या दरम्यान बीआरटी बसमार्गाचे काम या महिनाअखेरीला पूर्ण होत असून, जुलैमध्ये येथील बससेवा प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज होईल. शहराचा दक्षिण-उत्तर भाग या बससेवेने जोडला जाणार असल्याने या रस्त्यावरून बसगाड्यांचे नवीन मार्ग आखावे करावे लागणार आहेत.

पवना नदी, लोहमार्ग आणि पुणे मुंबई रस्ता यांना ओलांडून जाणारा संत मदर तेरेसा पूल या मार्गात येतो. या पुलाचे पंधरवड्यापूर्वी उद्‌घाटन झाले. त्यावरील बसथांबे, तसेच तेथील डेडिकेटेड बसमार्गाचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. ते काम ७० टक्के पूर्ण झाले. ऑटोक्‍लस्टरनंतर औद्योगिक वसाहतीतील इंडो लिंक आणि युरोसिटी या दोन कंपन्यांच्या जागा अद्याप ताब्यात मिळालेल्या नाहीत. तेथे बीआरटीलगतच्या रस्त्याने वळून पुढे मार्गस्थ होईल. ती जागा मिळविण्यासाठी एमआयडीसीकडे पाठपुरावा सुरू आहे.

याबाबत महापालिकेतील बीआरटीचे प्रवक्ते विजय भोजने म्हणाले, ‘‘स्थापत्यचे काम झाल्यानंतर बसथांबे व गाड्यांमध्ये आयटीएमएस यंत्रणा बसविण्याचे काम हाती घेतले जाईल. त्यामुळे प्रवाशांना बसथांबे, तसेच येणाऱ्या गाड्यांची माहिती मिळेल. पीएमपीला या संदर्भात आम्ही कळविले आहे.’’ या नवीन रस्त्यावरून सध्या बसमार्ग नाहीत. त्यामुळे तेथे नवीन मार्ग आखावे लागतील. त्याबाबत अभ्यास करून निर्णय घेण्यात येईल, असे पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

बीआरटीचे १५ बसथांबे
१) काळेवाडी फाटा २) रहाटणी फाटा ३) कुणाल हॉटेल ४) एम. एम. स्कूल ५) पेट्रोल पंपामागे ६) ज्योतिबानगर - पवनानगर ७) विजयनगर ८) चिंचवड लिंकरोड ९) पुणे मुंबई महामार्ग १०) ऑटो क्‍लस्टर ११) सिद्धेश्‍वर इंडस्ट्रीज १२) केएसबी चौक १३) शाहूनगर १४) आरटीओ कार्यालय १५) स्पाईन रस्ता.

बीआरटीसाठी स्थापत्य विभागाचे काम जूनअखेर पूर्ण होईल. कुदळवाडी ते चिखली या भागात रस्ता २४ ते ३० मीटर रुंदीचा असल्याने तेथे संमिश्र पद्धतीची बीआरटी असेल. तेथे रस्त्याच्या कडेला बसथांबे असतील. बीआरटीच्या मध्यभागी असलेल्या १५ थांब्यांपैकी १३ थांबे बांधून पूर्ण झाले. पुलावरील थांब्याचे, तसेच त्यांना पुणे-मुंबई रस्त्याला जोडण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या जिन्याचे काम सुरू आहे.
- राजन पाटील, सह शहर अभियंता

Web Title: PCMC BRT for South-North part