कचऱ्याचा प्रश्‍न आता सुटणार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जुलै 2018

पिंपरी - शहरातील वाढती लोकसंख्या, नवीन प्रभाग व क्षेत्रीय कार्यालयांची बदललेली रचना यांचा विचार करून कचरा संकलनासाठी क्षेत्रीय कार्यालय स्तरावर महापालिकेने नियोजन केले आहे. त्यासाठी ठेकेदार नियुक्त करून वाहने व कर्मचारी उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे कचरा संकलन व वाहतुकीचा प्रश्‍न आता सुटणार आहे. 

पिंपरी - शहरातील वाढती लोकसंख्या, नवीन प्रभाग व क्षेत्रीय कार्यालयांची बदललेली रचना यांचा विचार करून कचरा संकलनासाठी क्षेत्रीय कार्यालय स्तरावर महापालिकेने नियोजन केले आहे. त्यासाठी ठेकेदार नियुक्त करून वाहने व कर्मचारी उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे कचरा संकलन व वाहतुकीचा प्रश्‍न आता सुटणार आहे. 

नोकरी, व्यवसायानिमित्त शहरात येणाऱ्यांची संख्या वाढते आहे. त्यामुळे बांधकामे वाढून शहराचा विस्तारही होत आहे. परिणामी, कचरा संकलनावर परिणाम होत आहे. तसेच, विविध विकासकामे राबविण्यात सुसूत्रता यावी, यासाठी महापालिकेने प्रभाग व क्षेत्रीय कार्यालयांच्या रचनेत बदल केला आहे. सहाऐवजी आठ क्षेत्रीय कार्यालये झाली आहेत. त्यामुळे जुन्या प्रभाग व क्षेत्रीय कार्यालयांचे विभाजन होऊन काही भाग नवीन क्षेत्रीय कार्यालयांना जोडला आहे. मात्र, कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदारांचे ठेके कायम ठेवून त्यांची वाहने व कर्मचाऱ्यांची विभागणी करून कचरा संकलन व वाहतूक सुरू होती. त्यातील काही ठेकेदारांची मुदत संपली होती. काहींना मुदतवाढ दिली होती. आता नवीन ठेकेदार नियुक्त केले असून त्यांना वाहने दिली आहेत. वाहनचालक व अन्य कर्मचारीही वाढवून मिळाले आहेत. त्यामुळे सर्वच ठेकेदारांची मुदत डिसेंबर 2018 अखेरपर्यंत असून आठही क्षेत्रीय कार्यालयातंर्गत कचरा संकलन व वाहतुकीत सुसूत्रता येणार आहे. 

कचरा संकलनाचे नियोजन  
क्षेत्रीय कार्यालय स्तरावर कचरा संकलनाचे नियोजन आहे. त्यासाठी ठेकेदार नियुक्त असून वाहने दिली आहेत. त्यांनी कामगार नियुक्त केले आहेत. त्यांच्याद्वारे घरोघरचा ओला व सुका कचरा वेगवेगळा गोळा करून कचरा स्थलांतर केंद्रात आणला जातो. तेथून मोशी कचरा डेपोत नेला जाता. शहरातील कचरा कुंड्यांमधील कचरा कंटेनरद्वारे मोशी डेपोत नेला जातो. 

कचरा संकलन सद्य:स्थिती 
- महापालिका क्षेत्रीय कार्यालये : 8 
- घंटागाड्या टाटा एसीई : 302 
- घंटागाडी वाहनचालक : 298 
- वाहनांवरील कचरावेचक : 584 
- ढकलगाडीद्वारे कचरावेचक : 20 

Web Title: pcmc garbage issue slove