पिंपरी चिंचवडमध्ये या ५ ठिकाणी होणार 'हेरिटेज प्लाझा'; महापालिकेने घेतला सुशोभिकरणाचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 September 2020

महासाधू मोरया गोसावी यांचे चिंचवडमध्ये चारशे वर्षांपूर्वी वास्तव्य होते. तसेच, मंगलमूर्ती वाड्यातील श्रीगणेशाची मूर्तीही मोरयांनीच प्रतिष्ठापित केली आहे. तसेच, क्रांतिवीर चापेकर बंधूंमुळे चिंचवड ऐतिहासिकसुद्धा आहे. हा सर्व परिसर पवना नदी काठी असून हिरवाईने नटलेला आहे. याच नदीवर थेरगाव येथे बंधारा बांधलेला असून जलाशय निर्माण झालेले आहे. त्यात बोटिंग सुरू असते. ही सर्व स्थळे एकमेकांना जोडून परिसर सुशोभित केला जाणार आहे.

पिंपरी : चिंचवड येथील मंगलमूर्ती वाडा, चापेकर शिल्पसमूह, मोरया गोसावी समाधी मंदिर, थेरगाव बोट क्‍लब परिसरात 'हेरिटेज प्लाझा' करून सुशोभिकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. महासाधू मोरया गोसावी यांचे चिंचवडमध्ये चारशे वर्षांपूर्वी वास्तव्य होते. तसेच, मंगलमूर्ती वाड्यातील श्रीगणेशाची मूर्तीही मोरयांनीच प्रतिष्ठापित केली आहे. तसेच, क्रांतिवीर चापेकर बंधूंमुळे चिंचवड ऐतिहासिकसुद्धा आहे. हा सर्व परिसर पवना नदी काठी असून हिरवाईने नटलेला आहे. याच नदीवर थेरगाव येथे बंधारा बांधलेला असून जलाशय निर्माण झालेले आहे. त्यात बोटिंग सुरू असते. ही सर्व स्थळे एकमेकांना जोडून परिसर सुशोभित केला जाणार आहे. यामुळे चिंचवडच्या वैभवात भर पडणार आहे. यासाठी सुमारे बारा कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या कामाची निविदा प्रक्रिया गेल्या वर्षीच पूर्ण झाली असून लवकरच कामाला प्रारंभ होणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 ► क्लिक करा

पवना नदी काठी चिंचवड येथील महासाधू मोरया गोसावी यांचे संजीवन समाधी मंदिर आहे. त्यालगत प्रशस्त घाट बांधला आहे. मंदिराच्या मागील छोट्या मंदिरातून थेट नदी पात्रात जाता येते. मंदिरा शेजारी नदीलगत जिजाऊ उद्यान महापालिकेने विकसित केले आहे. शिवाय, मंदिरापासून अवघ्या काही फुटांवर मंगलमूर्ती वाडा आहे. अष्टविनायकातील एक स्थान असलेल्या मोरगाव येथून श्रीगणेश मूर्ती आणून मोरया गोसावी यांनी मंगलमूर्ती वाड्यात प्रतिष्ठापना केलेली आहे. तसेच, वाड्यात वेदपाठ शाळा आहे. 
Image may contain: outdoor, water and nature

मंगलमूर्ती वाड्यापासून काही अंतरावर चापेकर वाडा आहे. तेथून जवळच मुख्य रस्त्यावर चापेकर बंधूंचे शिल्पसमूह आहे. शहराचा इतिहास यामुळे उजळून निघतो. या शिल्पसमूहामुळेच चिंचवड मधील हे ठिकाण चापेकर चौक म्हणून ओळखले जाते. या चौकात आठ रस्ते एकत्र येतात. त्यामुळे नेहमीच वर्दळ असते. पूर्वी रस्त्याच्या मधोमध चापेकर बंधूंचे शिल्प होते. मात्र, चौकात उड्डाणपूल उभारल्यामुळे शिल्पसमूह रस्त्याच्या एका बाजूला उभारले आहे. शहरासाठी ते स्फूर्तीस्थळ आहे. 

कोरोनानंतर मुलांमधील "पिम्स' आजारासंबंधी डॉक्‍टरांचा सल्ला, वाचा सविस्तर
 

पवना नदीवर चिंचवड-वाल्हेकरवाडी आणि थेरगावच्या शिवारात बंधारा बांधला आहे. नदीच्या दोन्ही बाजूला हिरवीगार झाडी आहे. बंधाऱ्याच्या शेजारी महापालिकेने उद्यान उभारले आहे. बंधाऱ्यामुळे जलाशय निर्माण झालेले असून रावेतपर्यंत पाणलोट क्षेत्र आहे. या बंधाऱ्यात बोटींग सुविधा उपलब्ध असल्याने यालाच बोटक्‍लब असे म्हटले जाते. हे सर्वस्थळे सुशोभिकरणाने एकमेकांना जोडले जाणार आहेत. 
 

पुणेकरांनो, "आरटीओ'चे कामकाज आता सकाळी आठपासूनच ! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PCMC have decided to beautify 5 places as heritage plaza