चिठ्ठी ना कोई संदेस...

चिठ्ठी ना कोई संदेस...

पिंपरी - प्रसंग एक : अलीकडे आधारकार्डाची प्रत्येक ठिकाणी आवश्‍यकता भासते. त्यामुळे हे कार्ड काढण्यासाठी मी अर्ज केला होता. साधारणपणे तीन ते चार महिन्यांत टपालाने हे घरपोच मिळते, असा अनुभव अनेक नागरिकांनी सांगितला. माझ्या बाबतीत मात्र, तसे झाले नाही. आपले आधारकार्ड का आले नाही, याची चौकशी करण्यासाठी अनेक वेळा टपाल कार्यालयात खेटे घातले. त्या वेळेस साधे टपाल टाकण्यासाठी अपुरे कर्मचारी असल्याचे समजल्याने कार्ड कधी हातात पडेल, याची चिंता वाटू लागली चिंचवडमधल्या दळवीनगरमधील युवक आपली कैफियत सांगत होता....

प्रसंग दोन : पूर्वी साधी पत्रेही नियमितपणे मिळत होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ही पत्रे मिळणे पूर्णपणे बंद झाले आहे. त्यामुळे दिवसाआड पोस्टात जाऊन पत्र आहे का, याची चौकशी मी करतो. आम्हाला ऑक्‍टोबर २०१७ पर्यंत नियमितपणे पत्रे मिळत होती. आमच्या लाइनला पत्र टाकणारा पोस्टमन निवृत्त झाल्यानंतर टपाल कार्यालयाचे आमच्याकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. आतापर्यंत याबाबत पोस्टमास्तरांकडे दोन तीन तक्रारी केल्या. पण, काहीच होत नाही, आम्ही काय करायचे, असा सवाल प्रेमलोक पार्कमधील ज्येष्ठ नागरिकाने उपस्थित केला...

अलीकडच्या काळात कुरिअर, स्पीड पोस्टाने टपाल पाठवण्याचे प्रमाण वाढले असले, तरी अनेक जण साध्या पोस्टाने पत्र पाठवतात. गेल्या काही वर्षांपासून पोस्टमनची संख्या कमी झाल्यामुळे साध्या पत्रांची डिलिव्हरी मिळण्यात नागरिकांना अडचणी येत आहेत. बऱ्याचदा रजिस्टर पत्रांचे वाटप करणाऱ्या पोस्टमनकडे साधे टपाल देण्याची जबाबदारी देण्यात येते. साध्या पत्रांचे वाटप वेळेत होऊ शकत नाही. दरम्यान, साध्या पत्रांच्या वाटपासंदर्भात पोस्टमनकडे चौकशी केली असता वेळ मिळेल तेव्हा त्याचे वाटप करू, अशी उत्तरे मिळाल्याचे शहरातील नागरिकांनी सांगितले.

शहरातील टपाल कार्यालयांमध्ये आलेल्या साध्या टपालाचे तत्काळ वाटप करण्यात येते. शहराला किती पोस्टमनची आवश्‍यकता आहे, याचा आढावा घेऊन त्याची पूर्तता करण्यात येते. 
-परमेश्‍वर जाधव, उपविभागीय निरीक्षक

पिंपरी-चिंचवड टपाल कार्यालय
शहरातील पोस्टमनची संख्या - ५१
पत्रांची डिलिव्हरी होणारी केंद्रे  - १५
दररोज एका केंद्रावर येणारी रजिस्टर आणि स्पीड पोस्ट - १००० ते २०००

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com