अहो, आश्‍चर्यम्‌!  बुधवार पेठेत मोर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जुलै 2018

पुणे - बुधवार पेठेतील इलेक्‍ट्रिकल वस्तूंच्या जे. के. मार्केट इमारतीच्या छतावर सोमवारी सकाळी मोर सापडल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. साडेचार फुटांच्या या मोराला दक्ष नागरिकांनी पक्षीमित्रांच्या मदतीने पकडून कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात दिला. एरवी वनविभागात दृष्टीस पडणारा मोर भरवस्तीत आला कोठून, हा प्रश्‍न मात्र अनुत्तरीत आहे.

या संदर्भात रहिवासी किरण नंदुरकर म्हणाले, ‘‘रहिवाशांनी जे. के. मार्केटच्या इमारतीवर मोर दिसल्याचे व्यापाऱ्यांना सांगितले. त्यानंतर पक्षीमित्रांच्या मदतीने सकाळी दहाच्या सुमारास मोराला पकडले. तो जखमी अवस्थेत होता, त्याला उडता येत नव्हते. त्‍यामुळे कात्रज प्राणी संग्रहालयाशी संपर्क साधला. हा मोर कोठून व कसा आला, याबाबत माहिती मिळाली  नाही. ’’

पक्षी अभ्यासक उमेश वाघेला म्हणाले, ‘‘पुण्याच्या मध्यवर्ती पेठेत वर्दळीच्या ठिकाणी मोर सापडणे, ही आश्‍चर्याची गोष्ट आहे. नागरिकांना जर मोर किंवा अन्य दुर्मीळ पक्षी नागरी वस्तीत दिसल्यास तातडीने पोलिस, महापालिका प्रशासन किंवा प्राणिसंग्रहालयाला कळवावे. जेणेकरून त्या पक्षाचा जीव वाचू शकेल.’’

Web Title: Peacock found in budhawar peth pune