पुण्यात दुचाकीच्या धडकेने पादचाऱ्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

भालेराव हे फातिमानगर चौकातून पायी जात होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव आलेल्या दुचाकीने त्यांना धड़क दिली. त्यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

 

पुणे : रस्त्याने पायी जात असलेल्या एका पादचाऱ्यास भरधाव दुचाकीने धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने पादचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री 8 वाजता वानवडी येथील फातिमानगर चौकात घडली. 

पप्या गुलाबराव भालेराव (वय 40, रा. हडपसर) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी दुचाकीस्वार श्रीकृष्ण तोडे (वय 23, रा. शिरसाई, मावळ) यांच्याविरुद्ध वानवडी पोलिस ठान्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भालेराव हे फातिमानगर चौकातून पायी जात होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव आलेल्या दुचाकीने त्यांना धड़क दिली. त्यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pedestrian dies after hit by two wheeler