पुणे : भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचारी ठार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र मोरे हे शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता येरवडा येथील गोल्फ क्लब चौकातून जात होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यु झाला.

पुणे : रस्त्याने जाणाऱ्या पादचाऱ्यास भरधाव दुचाकीची धडक बसल्याने पादचारी गंभीर जखमी झाला. दरम्यान, नागरिकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, मात्र त्यांचा मृत्यु झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता येरवडा येथील गोल्फ क्लब चौक येथे घडली.

शिवसेनेला पाठिंबा देण्यावर काँग्रेसची सहमती; सूत्रांची माहिती

राजेंन्द्र मोरे (वय 50, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी अनोळखी दुचाकीस्वाराविरुद्ध येरवडा पोलिस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘मातोश्री’बाहेरच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करा असे पोस्टर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र मोरे हे शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता येरवडा येथील गोल्फ क्लब चौकातून जात होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यु झाला.

काँग्रेसचा अधिकृत प्रस्ताव नाही : शरद पवार

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pedestrian killed in a Two wheeler collision in Pune