पतीला व्यायामासाठी घेऊन गेली अन् जीव गमावून बसली

चिंतामणी क्षीरसागर 
रविवार, 9 डिसेंबर 2018

वडगाव निंबाळकर : आजारी पती बरोबर सकाळी बाहेर फिरायला चाललेल्या दांपत्याला कारची ठोकर बसल्याने झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू तर, पती गंभीर जखमी झाल्याची घटना बारामती तालुक्यातील चोपडज गावच्या हद्दीतील कानाडवाडी येथे शनिवार (ता. ९) सकाळी आठच्या दरम्यान घडली.

 पुणे (वडगाव निंबाळकर) : आजारी पती बरोबर सकाळी बाहेर फिरायला चाललेल्या दांपत्याला कारची ठोकर बसल्याने झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू तर, पती गंभीर जखमी झाल्याची घटना बारामती तालुक्यातील चोपडज गावच्या हद्दीतील कानाडवाडी येथे शनिवार (ता. ९) सकाळी आठच्या दरम्यान घडली.

चांगुना शिवाजी टकले (वय. ४५) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असुन पती शिवाजी मारूती टकले (वय. ६०) (रा. कानाडवाडी ता. बारामती) गंभीर जखमी झाले आहेत. शिवाजी यांना दिड वर्षापासुन अर्धांगवायुचा आजार आहे. पत्नी चांगुना त्यांना सकाळी कोवळ्या उन्हात घराबाहेर कानाडवाडी मुढाळे मार्गावरून फिरायला घेऊन चालली होती. परत येताना विरूद्ध बाजुने आलेली डिजायर कार (क्रमांक एमएच १२ एचएन ३७९७) ने दांपत्याला ठोकरले यामध्ये चांगुना यांचा जागीच मृत्यू झाला तर, पती शिवाजी यांना मोरगाव येथील खाजगी रूग्णालयात नेले आहे. अपघाताची माहिती मिळताच वडगाव निंबाळकर पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक समाधान चवरे घटनास्थळाकडे धाव घेतली. कार सोमेश्र्वरनगर परिसरातील आहे. तीघे जण यामध्ये होते. चालक आजुन निष्पन्न झाला नसल्याची माहिती दिली.

Web Title: pedestrian woman die in accident