पुण्यात पादचाऱ्यांकडील मोबाईल हिसकावणारे चोरटे गजाआड

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

पादचाऱ्यांकडील मोबाईल हिसकावून पसार होणाऱ्या दोन मोबाईल चोरट्यांना एमआयडीसी भोसरी पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून महागडे 28 मोबाईल हस्तगत केले असून लुटमारीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. 

पिंपरी : पादचाऱ्यांकडील मोबाईल हिसकावून पसार होणाऱ्या दोन मोबाईल चोरट्यांना एमआयडीसी भोसरी पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून महागडे 28 मोबाईल हस्तगत केले असून लुटमारीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. 

सलमान खाजा काझी (वय 18, रा. शिवाजी वाडी, मोशी), शुभम मारुती हिवरे (वय 18, रा. दिघी रोड, भोसरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. भोसरी एमआयडीसी परिसरात या चोरट्यांनी मोबाईल चोरी केल्याचे समोर आले. फोनवर बोलत पायी जाणाऱ्या नागरिकांना 'टार्गेट' चोरलेले 27 मोबाईल फोन व गुन्ह्यात वापरलेली एक दुचाकी असा चार लाख अकरा हजारांचा मुद्देमाल त्यांच्याकडून पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच या चोरट्यांकडून लुटमारीचे तीन गुन्हे उघडकीस आले.

मोबाईल चोरीला गेलेल्या नागरिकांनी एमआयडीसी भोसरी ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pedestrians Mobile Snatchers arrested in Pune