खडकवासला गावातील पेमेनी बंगला धोकादायक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जुलै 2018

धायरी - खडकवासला गावातील डॉ. पेमेनी बंगला धोकादायक झाला असून, तो कधीही कोसळण्याची शक्‍यता आहे. या परिसरात नागरिकांची वर्दळ असल्याने त्यांच्या जिवाला त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. हा बंगला पाडावा अशी मागणी पुणे शहर राष्ट्रवादी  काँग्रेसचे उपाध्यक्ष दीपक माने यांनी केली. 

डॉ. पेमेनी बंगला जीर्ण झाल्याने त्याच्या भिंती कोसळू लागल्या आहेत. गुरुवारी झालेल्या पावसात बंगल्याचा काही भाग कोसळला होता. या बंगल्यालगत लोकवस्ती व जिल्हा परिषद शाळा असल्यामुळे लहान मुलांचा वावर असतो. 
येथे दुर्घटना घडल्यास जीवितहानी होऊ नये यासाठी ग्रामपंचायत व जिल्हा प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून कारवाई करावी, अशी मागणी माने यांनी 
केली आहे.

Web Title: Pemeni Bunglow Dangerous