पुण्यात प्रथमच होणार ‘पेन काँग्रेस’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

पुणे - साहित्यिकांसाठी प्रतिष्ठेचे असलेले ‘पेन काँग्रेस’चे अधिवेशन यंदा प्रथमच भारतात तेही पुण्यात भरत आहे. येत्या २४ ते ३० सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या या अधिवेशनासाठी ७५ देशांतील २०० लेखक पुण्यात येणार आहेत. जगभरातील सहा हजार भाषांची ‘जागतिक भाषा वारी’ निघणार असून, अग्रभागी मराठी भाषेची दिंडी असेल. यानिमित्ताने मराठी भाषेला जगभरातील भाषांचे नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती पेन साऊथ इंडिया सेंटरतर्फे भाषातज्ज्ञ गणेश देवी यांनी दिली. 

कवी, निबंधकार, कादंबरीकारांसाठीची पेन इंटरनॅशनल ही जगविख्यात संस्था गेली ९८ वर्षे कार्यरत आहे. लेखकांचे हक्क सुरक्षित ठेवणे, भाषांतर संस्कृती वाढवणे यांसारखे कार्य ही संस्था करते. रवींद्रनाथ टागोर, मुन्शी प्रेमचंद, पंडित जवाहरलाल नेहरू, निस्सीम इझिकेल, सलमान रश्‍दी हे पेन काँग्रेसचे सदस्य होते. 

अधिवेशनात (ता. २५) हॉटेल हयात येथे निमंत्रितांसाठी देवी यांचे जागतिक साहित्य विषयावर सकाळी दहा वाजता व्याख्यान होईल. तत्पूर्वी २४ तारखेला बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात भरणाऱ्या विविध भारतीय भाषांच्या लिपींचा वापर करून केलेल्या कलाकृतींचे तसेच जया जेटली यांच्या निवडक ५० कला वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्‌घाटन सायंकाळी सहा वाजता होणार आहे. अधिवेशनात २८ तारखेला शहरातील २० शैक्षणिक संस्थांमध्ये भारतीय व परदेशी साहित्यिकांचे व्याख्यान होणार आहे.

Web Title: Pen Congress in Pune