विनाहेल्मेट दुचाकीस्वारांकडून  एक कोटी ९० लाखांचा दंड

बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

पुणे - शहर वाहतूक पोलिसांनी गेल्या १० महिन्यांत हेल्मेट परिधान न करणाऱ्या ३८ हजारांहून अधिक दुचाकी वाहनचालकांवर कारवाई केली असून, त्यांना एक कोटी ९० लाख रुपयांहून अधिक दंड (तडजोड शुल्क) ठोठावला आहे.

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

पुणे - शहर वाहतूक पोलिसांनी गेल्या १० महिन्यांत हेल्मेट परिधान न करणाऱ्या ३८ हजारांहून अधिक दुचाकी वाहनचालकांवर कारवाई केली असून, त्यांना एक कोटी ९० लाख रुपयांहून अधिक दंड (तडजोड शुल्क) ठोठावला आहे.

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

पोलिस आयुक्‍त के. व्यंकटेशम यांनी येत्या एक जानेवारीपासून शहरात हेल्मेट सक्‍तीची काटेकोर अंमलबजावणी करणार असल्याचे जाहीर केले. तसेच, सह पोलिस आयुक्‍त शिवाजी बोडखे यांनी मंगळवारपासून पोलिसांसह सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांपासून हेल्मेट सक्‍तीची अंमलबजावणी करण्यात येईल, असे सांगितले. यानंतर टप्प्याटप्प्याने औद्योगिक आणि खासगी संस्थांमधील कर्मचाऱ्यांना आणि एक जानेवारीपासून सर्वांना हेल्मेट सक्‍ती करणार असल्याचे सांगितले. या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. अनेकांनी अडगळीत पडलेली हेल्मेट बाहेर काढले. काही सरकारी कार्यालयांमध्ये टेबलांवर हेल्मेट ठेवल्याचे दृश्‍य पाहायला मिळाले.

अपघातात १७१ दुचाकीस्वारांचा बळी
यंदा जानेवारी ते ऑक्‍टोबरदरम्यान हेल्मेट परिधान न केल्यामुळे १७१ दुचाकीस्वारांना जीव गमवावा लागला. त्यामध्ये १३६ दुचाकी वाहनचालक तर, उर्वरित ३५ जण दुचाकीच्या मागील सीटवर बसलेले होते. तसेच, हेल्मेट परिधान करूनही अन्य दोघांचा मृत्यू झाला. परंतु, जड वाहनांच्या चाकाखाली आल्यामुळे त्या दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती शहर वाहतूक शाखेच्या पोलिस उपायुक्‍त तेजस्वी सातपुते यांनी दिली.

जानेवारी ते ऑक्‍टोबर २०१८

३८ हजार ५० - विनाहेल्मेट कारवाई दुचाकीस्वारांची संख्या

५०० रुपये - हेल्मेट परिधान न केल्यास दंडाची तरतूद

Web Title: Penalties from motorcycle in pune