रस्त्यांवर थुंकणाऱ्या तीनशे जणांना दंड 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018

पुणे - रस्त्यांवर थुंकणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी महापालिकेने कठोर पावले उचलली असून, तीनशे जणांवर दंडात्मक कारवाई केली. विशेष म्हणजे, अस्वच्छता करणाऱ्या व्यक्तींकडूनच जागेची स्वच्छती करून घेण्यात आली. शहराच्या वेगवेगळ्या भागांत सोमवारी सलग दोन तास राबविलेल्या या मोहिमेत ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, संबंधितांकडून तीस हजार रुपयांचा दंड वसूल झाला आहे. 

सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्याबाबत केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीची महापालिकेने अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यानुसार वर्दळीच्या ठिकाणी थुंकणे, लघुशंका किंवा शौच करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून, क्षेत्रीय कार्यालयनिहाय नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी 16 पथके नेमली आहेत. 

दरम्यान, या मोहिमेत उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, अतिरिक्त आयुक्त शीतल तेली-उगले यांच्यासह विविध खात्यांचे प्रमुख सहभागी झाले होते. 

सार्वजनिक ठिकाणी होणारी अस्वच्छता रोखण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येत आहे. सर्व 41 प्रभागांमध्ये अधिकारी-कर्मचारी नेमले आहेत. अस्वच्छता करणाऱ्यांना दंड केला जात असून, साफसफाई करून घेतली जात आहे. 
ज्ञानेश्‍वर मोळक, प्रमुख, घनकचरा व व्यवस्थापन विभाग, महापालिका 

Web Title: Penalties for three hundred people spit on the streets