एप्रिलमध्ये 36 हजार प्रवाशांकडून दोन कोटींचा दंड वसूल 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

पुणे - मध्य रेल्वेच्या पुणे विभागात एप्रिल महिन्यात तब्बल 36 हजार प्रवाशांकडून दोन कोटी चार लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यातील सुमारे 15 हजार प्रवासी विनातिकीट प्रवास करणारे होते. 

पुणे - मध्य रेल्वेच्या पुणे विभागात एप्रिल महिन्यात तब्बल 36 हजार प्रवाशांकडून दोन कोटी चार लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यातील सुमारे 15 हजार प्रवासी विनातिकीट प्रवास करणारे होते. 

पुणे-मळवली, पुणे-बारामती, पुणे-मिरज, पुणे-कोल्हापूर दरम्यान तिकीट तपासणी मोहिमेत ही कारवाई करण्यात आली. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात 30 हजार प्रवाशांकडून एक कोटी 75 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. सुट्यांच्या हंगामात प्रवाशांची संख्या वाढते. हे लक्षात घेऊन तिकीट तपासणी मोहीम राबिवण्यात येत असल्याचे पुणे विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक कृष्णाथ पाटील यांनी नमूद केले. पुणे-मळवलीदरम्यान सर्वाधिक विनातिकीट प्रवासी आढळले आहेत. या पुढच्या काळातही तिकीट तपासणी मोहीम वेगाने राबविण्यात येणार आहे. त्यात पकडल्या जाणाऱ्या प्रवाशांकडून दंडाच्या वसुलीबरोबरच पोलिस कारवाईही होऊ शकते, असे मध्य विभागाचे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांनी नमूद केले. 

Web Title: The penalty of 2 crores was recovered from 36 thousand passengers