मागविले बटर पनीर, पाठविले बटर चिकन; झोमॅटोसह हॉटेलला 55 हजारांचा दंड

zomato.jpg
zomato.jpg

पुणे :  उपवास सोडण्यासाठी पनीर बटर मागविल्यावर बटर चिकनचे पार्सल देणाऱ्या झोमँटो आणि एका हॉटेलला पुणे अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने 55 हजारांचा दंड ठोठावला आहे. आदेश दिल्यानंतर 45 दिवसांच्या आत ग्राहकाला दंडाची रक्कम द्यावी. दंड देण्यास उशीर झाल्यास त्या रकमेवर दहा टक्के व्याज आकारले जाणार असल्याचे मंचाच्याच्या निकालात नमूद करण्यात आले आहे.
 या प्रकरणी अॅड. षन्मुख देशमुख यांनी मंचात तक्रार केली होती. 

अॅड. देशमुख हे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वकिली करतात. 31 मे रोजी 2018 ते कामानिमित्त पुण्यात आले होते. त्या दिवशी त्यांचा उपवास होता. सायंकाळी उपवास सोडण्याकरिता त्यांनी झोमँटो अँपवरुन पनीर बटर मसाला मागवले. पार्सल आल्यानंतर त्यांनी जेवण वाढून घेतले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की ते पनीर नसून चिकन आहे. यानंतर देशमुख यांनी पार्सल देणाऱ्या झोमँटोच्या डिलिव्हरी बॉयला विचारले असता त्याने सांगितले, यात माझी काही चुक नसून जे पार्सल दिले जाते ते न उघडता संबंधित ग्राहकापर्यंत पोहचवले जाते. 
   
या प्रकारा बद्दल अॅड. देशमुख यांनी अॅड. संदेश गुंडगे यांच्याद्वारे झोमँटो आणि संबंधित हॉटेलला कायदेशीर नोटीस पाठवली. त्यात त्यांनी धार्मिक भावना दुखावल्याचे सांगत नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. मात्र, झोमँटो आणि हॉटेलचालकाकडून कुठला प्रतिसाद न मिळाल्यामुळे अॅड. देशमुख यांनी मंचात तक्रार केली. नुकसान भरपाईपोटी 5 लाख आणि मानसिक त्रासाबद्द्ल 1 लाख रुपये देण्याची मागणी केली होती. 

दुसऱ्यांदाही पाठवले चिकन
पनीर ऐवजी चिकन आल्यानंतर देशमुख यांनी संबंधित हॉटेलशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी दुसरे जेवण पाठवत असल्याचे सांगितले. दुस-या डिलिव्हरी बॉयने जेवणाचे पार्सल आणले. पावतीवर पनीर बटर मसाला लिहिले होते. पण देशमुख यांनी पार्सल उघडल्यानंतर त्यात पुन्हा बटर चिकन असल्याचे निदर्शनास आले पार्सल उघडल्यानंतर त्यात पुन्हा बटर चिकन असल्याचे  निदर्शनास आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com