पुण्यात पावसाची उघडीप अन् वीकएंड एन्जॉयमेंटसाठी लगबग!

मंगेश कोळपकर
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरणांच्या क्षेत्रात गेल्या 24 तासात तुफान पाऊस झाल्यामुळे वरसाघाव टेमघर वगळता वरसगाव, पानशेत आणि खडकवासला धरणे फुल्ल झाली आहे. तर, शहरातही पावसाची सकाळपासून ये-जा सुरू आहे. वारेही वाहत असल्यामुळे शहरात गारवा पसरला असून विकऐंड एन्जॉय करण्यासाठी परफेक्‍ट वातावरण निर्माण झाले आहे.

पुणे : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरणांच्या क्षेत्रात गेल्या 24 तासात तुफान पाऊस झाल्यामुळे वरसाघाव टेमघर वगळता वरसगाव, पानशेत आणि खडकवासला धरणे फुल्ल झाली आहे. तर, शहरातही पावसाची सकाळपासून ये-जा सुरू आहे. वारेही वाहत असल्यामुळे शहरात गारवा पसरला असून विकऐंड एन्जॉय करण्यासाठी परफेक्‍ट वातावरण निर्माण झाले आहे. 

पुण्यात गेल्या 24 तासांत पावसाने सातत्याने वारंवार हजेरी लवली तर, जिल्ह्यातही चांगला पाऊस पडला. त्यामुळे पानशेत, खडकवासला, वरसगाव ही धरणे फुल्ल झाली आहेत. पानशेत धरण भरल्यामुळे त्यातील पाणी खडकवासला धरणात सोडण्यात आले. त्यामुळे भरलेले खडकवासला धरणातील पाणी पुन्हा सोडावे लागले. शनिवारी सकाळी 25 ते 40 हजार क्‍यूसेकने खडकवासला धरणातून विसर्ग केल्यामुळे पुण्यातील बाबा भिडे पूल तसेच कामगार पुतळा, गरवारे महाविद्यालयाजवळील वस्ती, रजपूत झोपडपट्टीचा काही भाग पाण्यात गेला. 40 हजार क्‍सूसेकने विसर्ग गेल्या शहरात अतिदक्षतेचा इशारा देण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख गणेश सोनुने यांनी सांगितले. 

दरम्यान, शनिवार सकाळपासून पावसाने उघडीप दिली. त्यामुळे वारेही जोरात होते. परिणामी वातावरणात थंडावा निर्माण झाला होता. त्यामुळे वीक ऐंड एन्जॉय करण्यासाठी शहराबाहेर जाणाऱ्यांची गर्दी मोठी होती. तर, शहरातही स्वेटर, कानटोप्या बाहेर पडत असल्याचे दिसत होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: people are ready for Weekend Enjoyment in Rain at Pune