पासपोर्ट मिळण्यासाठी लोकांचा वाढतोय प्रतिक्षाकाळ

People have to wait for a passport to be received
People have to wait for a passport to be received

बारामती शहर - पासपोर्टबाबत पोलिस व पासपोर्ट कार्यालयात समन्वयाचा अभाव असल्याने लोकांना दिरंगाईचा फटका सहन करावा लागत आहे. पोलिस तपासणीबाबत नेमकी चौकशी करायची कोणाकडे याबाबत स्पष्टता नसल्याने पासपोर्ट मिळण्यासाठी लोकांचा प्रतिक्षाकाळ वाढतच चालला आहे. 

पुणे व बारामती पासपोर्ट कार्यालयात दाखल होणाऱ्या पासपोर्ट प्रकरणात पोलिस तपासणीत होणारी दिरंगाई हा सर्वाधिक कटकटीचा विषय आहे. पासपोर्टचे प्रकरण दाखल झाल्यानंतर संबंधित पोलिस ठाण्यात तपासणीसाठी प्रकरण येते. मात्र त्या पोलिस ठाण्यातील संबंधित पोलिस कर्मचाऱ्याला वेळ असेल तरच तपासणी वेळेत होते, अन्यथा तुमचे तपासणीचे प्रकरण अद्याप आमच्यापर्यंत आलेलेच नाही, असे उत्तर लोकांना मिळते.

एकीकडे पासपोर्टच्या संकेतस्थळावर पोलिस ठाण्यात तपासणीसाठी प्रकरण पाठविल्याचे दिसत असते तर दुसरीकडे पोलिस प्रकरण आमच्यापर्यंत आलेलेच नाही असे उत्तर देतात. अशा वेळेस चौकशी केली तरी लोकांचा फुटबॉलच होतो. पासपोर्ट कार्यालय सांगते की, तुमची तपासणी पाठवली आहे, पोलिस सांगतात आलीच नाही. अशा वेळेस लोक हतबल होतात. 
अनेकदा लोकांना लवकर पासपोर्ट हवा असतो पण पोलिस दिरंगाईने लोक वैतागून जातात. पोलिसांच्या वेळेनुसार व सवडीनुसार तपासणीचे काम केले जात असल्याने लोक त्रस्त आहेत. अनेकदा महत्वाची कामे टाकून लोक तपासणीसाठी येतात पण कधी पोलिस असला तर साहेब नसतात आणि साहेब असतील तर संबंधित कर्मचारीच नसतो. याचा फटका लोकांचा वेळ व श्रम वाया जाण्यात होतो. 

सध्या ऑनलाईनचा जमाना असतानाही त्याचा वापर जिल्हा पोलिस दल का करत नाही हा प्रश्नही अनुत्तरितच आहे. पासपोर्ट आणि जिल्हा पोलिस दलात समन्वय साधून किमान सात दिवसात पोलिस तपासणी कशी होईल या साठी उपाययोजना करण्याची लोकांची मागणी आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com