'साथ चल' दिंडीमध्ये संस्था, सोसायट्यांचा सहभाग 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जुलै 2018

पिंपरी : 'सकाळ' माध्यम समूह आणि फिनोलेक्‍स केबल्स'च्या 'साथ चल' दिंडीला पिंपरी-चिंचवड शहरातून उदंड प्रतिसाद मिळाला. शनिवारी (ता. 7) या दिंडीने पुण्याच्या दिशेने प्रस्थान ठेवले. उद्योजक, डॉक्‍टर्स, अभियंते, लेखक, कवी, कलाकार, राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांसह असंख्य संस्था, संघटना, हौसिंग सोसायट्या, शाळा-महाविद्यालयांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आई-वडिलांना सांभाळण्याची शपथ घेतली. 

'साथ चल' दिंडीत सहभागी झालेल्यांमध्ये फिनोलेक्‍स कंपनीचे कर्मचारी, एचए मजदूर संघ, एसकेएफ कामगार संघटना, पतंजली, आर्ट ऑफ लिव्हिंग, सोहम योग संस्था, महाराष्ट्र योग असोसिएशन, क्विन्स टाऊन हाउसिंग सोसायटी, निरुपमा हौसिंग सोसायटी, एम्पायर इस्टेट हाउसिंग सोसायटी, सागर हाउसिंग सोसायटी, लायन्स क्‍लब, इनरव्हिल क्‍लब, अग्रसेन चॅरिटेबल ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड डेंटल असोसिएशन, गोदावरी हिंदी स्कूल, प्रतिभा कॉलेज, नॉव्हेल इन्स्टिट्यूट, एटीएस कॉलेज, राजमाता जिजाऊ कॉलेज, एआयएम कॉलेज, आर्य समाज स्कूल, पिंपरी डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज, आचार्य आनंद ऋषी स्कूल, ज्ञानराज स्कूल, मनोरमा हायस्कूल, स्वामी समर्थ भक्त परिवार, निमा संघटना, नाना धर्माधिकरी प्रतिष्ठान, संस्कार प्रतिष्ठान, पोलिस मित्र मंडळ, अष्टविनायक महिला ग्रुप, भावसार व्हिजन ग्रुप, एकनिष्ठ युवा मंच यांचा समावेश आहे. 

Web Title: people involving in saath chal campaign