पुणे विद्यापीठ चौकातील नवीन पुलाच्या कामाबाबत महत्वाच्या अपडेट

सकाळ वृत्तसेवा
Friday, 14 August 2020

लोकप्रतिनिधी व अधिका-यांनी घेतला विद्यापीठ चौकातील कामाचा आढावा. 

औंध : पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) पुणे महानगरपालिका व पुणे मेट्रोकडून उभारल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील  नवीन पुलाच्या कामाचा अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी आज आढावा घेतला.

अरे वा, 95 वर्षांच्या आजीबाईंची कोरोनावर मात 

यावेळी शहर सुधारणा समिती अध्यक्ष व नगरसेवक अमोल बालवडकर यांनी मनपाचे अभियंता इंद्रभान रणदिवे, पीएमआरडीएच्या अभियंता दिपाली वाणी, उपअभियंता विशाल भोसले, मनपाचे सल्लागार जितेंद्र लवांडे व मोहन साखळकर यांच्यासह पाहणी करुन सुचना काही केल्या.नव्याने विकसित करण्यात येत असलेल्या या पुलाच्या कामाच्या नियोजनाची पाहणी करुन कामाचा आढावा घेतला.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, या रस्त्यावरील वाहतुक नियोजनासह  हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो व मेट्रोचा वापर करणा-या पुणेकर नागरीकांसाठी मुबलक व सुयोग्य पार्किंग व्यवस्था उपलब्ध करणे आवश्यक असल्याचे सांगून त्याबाबत ठोस उपाय योजना करण्याच्या सुचना बालवडकर यांनी अधिका-यांना केली. तसेच संबंधित ठिकाणी इलेव्हेटेड पार्किंग किंवा अंडरग्राऊंड पार्किंग करण्यासंदर्भात ठोस पावले उचलण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

शेतकऱ्यांसाठी खूशखबर, दौंडमध्ये मुगाचे दिवसाआड लिलाव

तसेच याविषयीचा ठराव शहर सुधारणा समितीत मांडून मंजूर केल्याचे बालवडकर यांनी सांगितले. यावेळी पुणे मनपा, पीएमआरडीए व पुणे मेट्रोच्या अधिका-यांशी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. 

(Edited by : Sagar Diliprao Shelar)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: People's representatives and officials reviewed the work at University Chowk