प्लॅस्टिकबंदी, "कुंपणच खातंय शेत'

plastic
plastic

दौंड (पुणे) : दौंड नगरपालिकेत नगरसेवक व त्यांचे नातेवाईक जप्त केलेले प्लॅस्टिक सोडविण्यासाठी पुढाकार घेत असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे. नगरपालिका कार्यालयासमोरील एका दुकानातून जप्त केलेले प्लॅस्टिकचे पोते कार्यालयातून दमदाटी करीत परत नेण्यात आले. या प्रकारामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारवाईवर मर्यादा आल्या आहेत.

केंद्र सरकारने यंदा महात्मा गांधी जयंतीपासून देशभरात प्लास्टिक बंदी लागू केली. त्यानंतर दौंडच्या नगरपालिकेने प्लॅस्टिकचा साठा व विक्री करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली. नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी कारवाई करीत आहेत, परंतु कमी मनुष्यबळ व कार्यबाहुल्यामुळे परिणामकारक कारवाई होऊ शकली नाही. नगरपालिका कार्यालयासमोरील दुकान व शहरातील महात्मा गांधी चौकात प्लॅस्टिक विक्री करणाऱ्यांवर कारवाई करत प्लॅस्टिक जप्त करण्यात आले होते. परंतु, ते सोडविण्यासाठी नगरसेवक व नगरसेवकाच्या नातेवाइकांनी कार्यालयात येऊन गोंधळ घालत दमदाटी करीत प्लॅस्टिकचे पोते परत नेले. 

नगरपालिकेच्या जप्ती व दंडात्मक कारवाईचा अजिबात धाक नसल्याने प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. प्लॅस्टिक पिशव्या, प्लास्टिक आणि थर्माकॉलचे ग्लास, ताट, वाट्या, चमचे, आदी मोठ्या प्रमाणावर विकले जात आहेत. शहरात प्लॅस्टिकची विक्री करणारे किमान 40 ठोक व्यापारी आहेत. त्यांच्याकडून किरकोळ व ठोक दुकानदार, हॉटेल, कापड दुकाने, भाजीपाला विक्रेते, हातगाडीवाले व अन्य व्यापारी आस्थापनांना प्लॅस्टिक सरार्सपणे विक्री केली जाते. 

नगरपालिकेने प्लॅस्टिक विक्रीप्रकरणी गेल्या 40 दिवसांत 60 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली असून, अवघे 75 किलो प्लॅस्टिक जप्त केले आहे. 

जप्त केलेला प्लॅस्टिकचा माल नेल्याचा प्रकार माझ्या निदर्शनास आलेला नाही. याबाबत चौकशी करून कारवाई करू. कोणाचीही तमा न बाळगता कारवाई सुरू राहील. 
- मंगेश शिंदे, 
मुख्याधिकारी, दौंड नगरपालिका  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com